मंदिरात नारळ फोडल्याने कुटुंबावर गावाचा बहिष्कार

आपण २१ व्या शतकात वावरत असलो तरी जातीभेद काही कमी झाल्याचे दिसत नाही. दोन दिवसांपूर्वीच अमरावती जिल्ह्यात एका विशिष्ट समाजाला पाणीपुरवणा नाकारला होता. यामुळे गावकऱ्यांनी चांगलेच आंदोलन पुकारले हेते. ही घटना ताजी असतानाच मंदिरात नारळ फोडल्याने मागासवर्गीय कुटुंबावर गावाने बहिष्कार (Village boycott on backward class families) घातला. पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी ही घटना लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात घडली. दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला आहे.
ताडमुगळी गावातील मागासवर्गीय कुटुंबातील तरुणाने गावच्या मंदिरात नारळ (Coconuts were broken in the temple) फोडला म्हणून बहिष्कार टाकण्यात आला. तीन दिवसांपासून या कुटुंबावर बहिष्कार असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. कर्नाटक सीमावर्ती भागाच्या जवळ हे गाव आहे. तरुणाने गावातील मंदिरात नारळ फोडल्यानंतर गावातील लोकांनी त्याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला होता. गावकीत सहभाग नको, किराणा, दळण बंद, शेतातील मजुरीसाठी बोलावणे बंद केले होते. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चर्चा करून प्रकरण मिटवले.

घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला. आता या प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी करून अशा समाजकंटाकावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. मात्र, बहिष्काराचे हे अस्त्र सर्वप्रथम कोणी उगारले?, कुणी पुढाकार घेतला? याबाबतची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. पोलिसांनी हे प्रकरण मिटवल्याने अद्याप गुन्हा दाखल केला गेलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *