देशाला शेवटचा संदेश देत काय म्हणाल्या होत्या लता दीदी?
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच आपल्या आठवणी सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहेत. लता दीदींचं निधन हे मनोरंजन जगताचं मोठं नुकसान आहे. ज्याची भरपाई क्वचितच कोणी करु शकेल. लता दीदींचा आवाज हीच त्यांची ओळख होती आणि राहील. आता त्या या जगात नसल्या तरी त्यांचा आवाज अजरामर आहे.
अनुपम खेर यांची फेसबुक पोस्ट-
दरम्यान, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Khair) यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर (Facebook Post) लता दीदींना एक वेगळीच श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लता दीदींचा एक ऑडिओ रेकॉर्डिंग (Audio Recording) शेअर केला आहे. जो गेल्या वर्षी डिसेंबरचा आहे. पण या ऑडिओमध्ये लता दीदी देशवासीयांना देत असलेला संदेश हा त्यांचा शेवटचा संदेश असेल, हे कोणास ठाऊक होतं. अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे.
या ऑडिओमध्ये लता मंगेशकर म्हणत आहेत- ’75 वर्ष, देशाच्या विविध पंतप्रधान आणि मंत्र्यांनी दिवसेंदिवस भारताला खूप उच्च स्थानावर नेलं आहे. आणि आज आपण आनंदी आहोत. आदरणीय नरेंद्रभाऊ, आमचे सरकार, आमचे लोक यांना माझं मनःपूर्वक वंदन. हे सर्व म्हटल्यावर भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाचा एक श्लोक आहे, ज्याचा मी पाठ करणार आहे’.असं म्हणत दीदींनी श्लोक म्हटलं आहे.
हा श्लोक म्हटल्यानंतर लता दीदी म्हणाल्या- ‘भगवान श्रीकृष्णांनी हे म्हटलं आहे. आणि ते नेहमी आपल्यासोबत असले पाहिजेत, आजही ते आपल्यासोबत आहेत. आणि यापुढे भविष्यातही असतील असा माझा विश्वास आहे. मी तुम्हा सर्वांना नमन करून तुमची परवानगी घेते.असं म्हणत लता दीदींनी आपला शेवटचा संदेश भारतीयांना दिला होता.
काल त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आलं. दीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं.यावेळी राजकीय नेत्यांपासून अनेक बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती होती.लता मंगेशकर गेली 28 दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. यादरम्यान त्यांना अनेकदा जनरल वॉर्ड आणि आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांना आयसीयूमधून बाहेर काढण्यात आलं होतं. परंतु आदल्या दिवशी त्यांची प्रकृती चिंताजनक वाटू लागल्यानं त्यांना पुन्हा लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं होतं.परंतु त्यांची ही झुंज अपयशी ठरली.