रोजच्या जेवणाला महागाईची फोडणी!
भारतीय आहारात मसाल्याचे (spice) महत्त्व फार आहे. बाजारात विविध कंपन्यांचे पॅकेट बंद मसाले अगदी दहा रुपयांपासून किलोच्या दरात विकले जात असले तरी उन्हाळ्याची चाहूल लागताच वर्षभरासाठी मसाला तयार करून घेतला जातो. प्रत्येक जण त्याच्या खाण्यापिण्याच्या आहार पद्धतीनुसार ते तयार करतो. यंदा मसाल्याच्या किमतीत २० टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळ्यात मसाल्याचे दर वाढलेले असतात. याच वेळेत मसाले वाळवून ते कुटले जातात. यंदा मागणी जास्त असल्याने मसाल्याच्या वस्तूंमध्ये दरवाढ झालेली दिसून येत आहे.भारतात विविध प्रकारचे मसाले तयार होतात. मात्र, सिंगापूर, इंडोनेशिया या ठिकाणांहून मसाल्याचे पदार्थ फूल, धने, जीरे भारतात येतात. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने मसाले महागले आहेत. असे किराणा व्यापारी सांगत आहेत.
मागील पाच ते सहा महिन्यापासून मसाला (spice) करण्यासाठी लागणारे हळद, जिरे, फुल आदींची आवक कमी झाली आहे.यातच महागाईने कळस गाठला असून हामाली मधील उतराई व चढाईचे दरही गगनाला भिडले आहेत. परीनामी मसाल्याच्या वस्तू महाग होऊन बसले आहेत. त्यामुळे मसाला करणे अवघड होउन बसले आहे. खरेदीसाठी दुकानावर आलेले ग्राहक अचंबित होऊन मसाला विकत घेत आहेत.
काय आहेत मसाल्याचे भाव?
हळद जुने दर – ८०
नवा दर -११०
जिरे जुने दर – १८०
नवा दर – २३०
धने जुने दर -१३०
नवा दर – १४०
फूल जुने दर – ६५०
नवा दर – ८००
लाल मिरची येते कुठून…?
मसाल्याला लाल मिरची लागते. पांडी, कश्मिरी, बेडगी, साधी अशा विविध प्रकारच्या मिरच्या पश्चिम महाराष्ट्रातून येतात. त्याचबरोबर सगळ्यात जास्त माल हा उत्तर महाराष्ट्रातील नंदूबारमधून येतो. काही मिरच्या कर्नाटकातून येतात.
गृहिणी काय म्हणतात?
आमच्या घरी दरवर्षी मसाला केला जातो. साधारणत: फेब्रुवारी महिन्यापासून त्याची तयारी सुरू होते. मसाल्यासाठी मिरची खरेदी करणे. अन्य मसाले आणणे, ते वाळवून, तेलात भाजून त्यानंतर ते कुटण्यासाठी दिले जातात. यंदा, मसाल्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे आमच्या खिशाला झटका बसत आहे.