बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या (Student) परीक्षा ऑफलाईन (offline exam) घेण्यावरून सध्या राज्यामध्ये वाद आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, काॅलेज आणि शाळा ऑनलाईन (Online) पध्दतीने झाल्या आहेत तर मग परीक्षा कशी ऑफलाईन? विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असतानाच आता आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट मिळणार आहे. यामुळे आता एकच गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी आंदोलने देखील केली.

ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना मिळणार हाॅलतिकिट

ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपला निर्णय बदलला नाही. परीक्षा ऑफलाईनच होणार हे काल बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर हॉलतिकीट बाबत माहिती देण्यात आली आहे. यामुळे आता राज्यातील विद्यार्थ्यांना अभ्यास केल्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. कोरोनाच्या महामारीचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळेच परीक्षा ऑनलाईन घ्यावी अशी मागणी होती. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा याआधीच जाहीर केल्या असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाला आणि परीक्षेच्या नियोजनाला पुरसा वेळ मिळाला आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर

ऑफलाईन पध्दतीनेच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या (Student) परीक्षा होणार आहेत. हे आता निश्चित झाले आहे. मात्र, खरा प्रश्न येतो तो म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा. कारण गेल्या दोन वर्षांपासून जवळपास ऑनलाईन पध्दतीनेच काॅलेज झाले आहे. हातावर मोजण्या इतक्याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पध्दतीने धडे घेतले आहेत. त्याचे कारण म्हणजे ग्रामीण भागामध्ये नेटवर्क आणि स्मार्ट फोन विद्यार्थ्यांकडे नव्हते. त्यातुलनेत शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचले. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थी या बारावीच्या परीक्षेला कशाप्रकारे सामोरे जातील हा मोठा विषय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *