भारताला तिसरा झटका, विराट कोहली बाद
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अनफिट किरॉन पोलार्डच्या जागी निकोलस पूरन वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व करत आहे. टीम इंडियाने इशान किशनच्या जागी केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. भारताची धावसंख्या 23 षटकात 3 बाद 78 आहे.
ओडीन स्मिथने 12 व्या षटकात भारताला दोन झटके दिले. पहिल्या चेंडूवर ऋषभ पंत तर 6 व्या चेंडूवर विराट कोहलीला बाद केले. विराट 30 चेंडूत 18 धावा करून माघारी परतला. स्मिथने चौथ्या स्टंपवर 142 च्या गतीने फुलर लेन्थ फेकलेला चेंडू विराट ड्राईव्ह करायला गेला, त्याचवेळी बाहेरच्या चेंडू बॅटची काडा घेऊन विकेटकीपरच्या हातात गेला.
12 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भारताला ऋषभ पंतच्या रुपात दुसरा झटका बसला. ऑफ स्टंपच्या बाहेर जात असलेला शॉर्ट ऑफ गुडलेंथ चेंडू पुल करण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. त्याने फटकावलेला चेंडू शॉर्ट स्वेअर लेगला गेला. मिड विकेटच्या फील्डरने कोणतीही चूक न करता झेल पकडला. ओडीन स्मिथने विकेट घेतली तर होल्डरने झेल पकडला. पंतने 34 चेंडूत 18 धावा केल्या.
रोहित शर्मा बाद…
टीम इंडियाची खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा 5 धावा करून बाद झाला. त्याला केमार रोचने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विकेटकीपर शे होपने झेल पकडला.
टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली तेव्हा केएल राहुलच्या जागी सलामीला विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत रोहित शर्मासोबत आला. गेल्या सामन्यात इशान किशन सलामीला आला होता. राहुलचे पुनरागमन झाल्याने इशानला संघाबाहेर बसावे लागले.
निकोलस पूरन हा वेस्ट इंडिज संघासाठी ODI मध्ये कर्णधार पदाची जबाबदारी पार पाडणारा 30 वा खेळाडू ठरला.
ऋषभ पंत वनडेमध्ये पहिल्यांदाच सलामीला आला आहे.
विराट कोहलीची वनडेतील ही 250वी खेळी आहे.
घरच्या मैदानावर कोहलीचा 100 वा एकदिवसीय सामना..
भारतीय भूमीवर विराट कोहलीचा हा 100 वा एकदिवसीय सामना आहे. अशी कामगिरी करणारा कोहली हा 5वा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर (164), एमएस धोनी (130), मोहम्मद अझरुद्दीन (113) आणि युवराज सिंग (111) यांचा क्रमांक लागतो.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडियाला मालिकेत विजयी आघाडी घ्यायची आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिज आजचा सामना जिंकून मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी धडपडेल.
भारताचा संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा
वेस्टइंडीजचा संघ :
शे होप (विकेटकीपर), ब्रँडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शमार ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), ओडीन स्मिथ, जेसन होल्डर, फेबियन ॲलेन, अकील हुसेन, अल्जारी जोसेफ, केमार रोच