कॅप्टन रोहित चहलवर भडकला म्हणाला
वेस्टइंडिज विरूध्दच्या दुसऱ्या वन डे सामन्यात रोहित शर्मामधील नेतृत्व गुण सर्वांनीच पाहिले. रोहितने अचूकवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे भारताने हा सामना ४४ धावांनी जिंकला. तीन सामन्यांची मालिका टीम इंडिया आपल्या खिशात घातली.
दुसऱ्या वन डे सामन्यात कर्णधार रोहित फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. केवळ ५ धावा करून ताे तंबूत परतला. यानंतर भारताने वेस्ट इंडिजला २३८ धावांचे लक्ष्य दिले. विंडीज हे आव्हान सहज पार करेल, असे वाटत हाेते; पण, क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरल्यानंतर कॅप्टन राेहितने संघाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने घेतलेले अचूक निर्णय आणि भारतीय गाेलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे सामना भारताच्या बाजूने झुकत गेला.
वेस्ट इंडिजचे फलंदाज समाधानकारक कामगिरी करु शकले नाहीत. ४५व्या षटकात रोहित शर्माने क्षेत्ररक्षणात बदल केला. तो चहलला सीमारेषेजवळ जाण्यास सांगत हाेता. या वेळी चहल मैदानात खूप हळूहळू चालत होता. यावर राेहित भडकला. ‘क्या हुआ तेरेको’, भाग क्यू नही रहा ठीकसे चल उधर भाग! अशा शब्दात त्याने चहलला सुनावले. कर्णधार रोहितने ओरडल्यानंतर चहल धावत क्षेत्ररक्षणासाठी गेला.