पंतप्रधान मोदींच्या ‘त्‍या’ वक्तव्यावरुन काँग्रेस-भाजप आमनेसामने

नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली. यामुळे पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. (congress vs bjp)

देशात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्याविरोधात काँग्रेसनं राज्यभर आंदोलन केलं होतं. आज नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींच्या घरासमोर आंदोलन केलं
नागपुरात काँग्रेस कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात आंदोलनासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर आले. मात्र आधीपासूनच तिथे भाजप कार्यकर्त्यांची गर्दी होती त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला काँग्रेस तर दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते असं चित्र दिसून आलं. गडकरींच्या घरासमोर पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसनं आंदोलन सुरु केलं. याचवेळी गडकरींच्या घराखाली भाजपचेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले.
मोदी सरकारविराेधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी केली. महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही. पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही त्‍यांनी केली. तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर भाजप कार्यकर्ते देखील झेंडे घेऊन उभे ठाकल्याचे चित्र होते. जय श्रीराम, पंतप्रधान मोदी जिंदाबाद अशी घोषणाबाजी भाजप कार्यकर्ते करत होते. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *