ठाकरे-पवारांचं नवीन ‘मिशन’ झालं सुरू…

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी वरळी मतदारसंघाचा दौरा (mandatory inspection) केला. वरळी मतदारसंघातील विकास कामांची दोन्ही मंत्र्यांनी पाहणी केली. मात्र, दोन्ही मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

वरळी हा मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. वरळी मतदारसंघातील विकास कामांची पाहणी (mandatory inspection) करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांनी एकाच गाडीतून पोहोचले. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे स्वत: गाडी चालवत होते तर त्यांच्या शेजारील सीटवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बसले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या मतदारसंघात किंवा पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातील कामाची पाहणी करण्यासाठी, उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी सकाळी-सकाळीच हजर होतात.

सकाळी 6 वाजल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामांची सुरुवात होते. अजित पवार यांच्या प्रमाणेच आता सकाळी लवकर कामाची सुरुवात करण्याचा वसा आदित्य ठाकरे घेत आहेत का? अशीही चर्चा होत आहे.

आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत आता कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. रस्ते मोठ-मोठे करण्यात येत आहेत. आपल्या मतदारसंघाचा आणखी विकास करण्यात (smart news) यावा, तसेच आपल्या मतदारसंघाचा अर्थमंत्र्यांनी करावा यासाठी आदित्य ठाकरे यांनी अजित पवार यांच्यासोबत हा दौरा केला असल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *