सलग दुसऱ्या दिवशी दोन कारखान्यांना आग, लाखोंचे नुकसान

येथे सलग दुसर्‍या दिवशी सोलापूरातील यंत्रमाग कारखान्याला आग लागून लाखों रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ७० फुट रोडवरील दोन यंत्रमाग कारखान्यांना आग लागून आगीत लाखों रुपयांचा माल जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या आटोक्यात आणण्यात आली. (Solapur Fire)

साईबाबा चौक येथील गड्डम टॉवेल कारखान्याला आग लागून लाखो रुपयांचे सूत जळून बेचिराख झाले आहे. अग्निशमन दलाच्या ६ गाड्यांनी पाण्याचा फवारा केल्याने आग आटोक्यात आली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सूताचे रोल आणि टॉवेल असल्याने आगीने रोद्ररुप धारण केले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

व्यंकटेश भंडारी सत्यनारायण गड्डम यांच्या टॉवेल कारखान्याला शनिवारी सकाळी अचानक आग लागली. आगीचे लोण बाहेर दिसताच आजूबाजूच्या नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन वरून माहिती दिली. काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले.आगीने शेजारच्या भंडारी कारखान्याला देखील आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली. या आगीत टॉवेल आणि नॅपकिन बनविण्याचे कच्चा माल, पक्का माल, सुताचे पोते मशिनरी असा अंदाजे 20 ते 25 लाख रुपयांचा नुकसान झाला असल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
अग्निशमन दलाचे सोलापुरात रविवार पेठ, होटगी रोड, आसार मैदान परिसरात केंद्र आहे. मात्र शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये केंद्र नाही. शुक्रवारी व शनिवारी सलगर दोन दिवस एमआयडीसी परिसरातील कारखान्यांना आग लागून कोट्यावधीचे नुकसान झाले.
शनिवारी गड्डम कारखान्याला आग लागल्यानंतर पाण्याची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत बाजूच्या कारखान्याला देखील आगीची झळ पोहोचली आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये अग्निशमन दलाचे केंद्र उघडावे अशी मागणी एमआयडीसीमधील कामगार आणि कारखानदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *