ईशान किशनसाठी अंबानींना घामटा फोडणारी ती सुंदरी आहे तरी कोण ?
सध्या आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये मेगा ऑक्शन सुरू आहे. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंवर कोट्यवधीने पैसे खर्च करण्यात आले. कालच्या दिवसात सर्वात मोठी बोली भारताचा युवा विकेटकीपर-फलंदाज ईशान किशनवर लावण्यात आली. त्याला मुंबई इंडियन्स संघाने १५.२५ कोटी रूपयात विकत घेतले.सर्वांनाच माहित आहे की, मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीन नीता अंबानी आहेत. या ऑक्शन ईशानला आपल्या संघात घेण्यासाठी एका सुंदर तरूणीने अंबानींशी पंगा घेतला. या बेधडक तरूणीची चर्चा कालपासून सर्वत्र चालू आहे.
आयपीएल ऑक्शनच्या पहिल्या दिवशी ईशानचे नाव लिलावासाठी घेतले गेले त्यावेळी या आक्रमक युवा खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी अनेक संघानी रस दाखवला. परंतु, ईशानला आपल्या संघात घेण्यासाठी खरी चढाओढ दोन संघामध्ये पहायला मिळाली. यावेळी ईशानचा जुना संघ मुंबई इंडियन्स त्याला पुन्हा एकदा आपल्या संघात घेण्यासाठी ठाम होता तर, दुसऱ्या बाजूने एक सुंदर तरूणी ईशानला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स सोबत पंगा घेताना दिसत होती.
आयपीएल लिलावात मुंबईशी पंगा घेतलेल्या या तरूणीचे नाव आहे, काव्या मारन सनरायझर्स हैदराबाद संघाची सहमालकीण आहे. दक्षिण भारतामध्ये ‘सन टीव्ही’ चांगलेच प्रसिद्ध आहे. सन नेटवर्कची ती मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
आतापर्यंतची सर्वात महागडी भारतीय मुख्य कार्यकारी अधिकारी काव्या ठरली आहे. काव्याचे बाबा कलानिथी मारन यांनी सन नेटवर्क सुरु केले होते. मारन कुटुंबियांचे भारतीय राजकारणाशी चांगले संबंध आहेत. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्याशी मारन कुटुंबियांचे जवळचे संबंध आहेत. त्याचबरोबर कलानिथी मारन यांचे वडिल केंद्रीय मंत्रीही होते, तर त्यांच्या बंधूंनीदेखील केंद्रीय मंत्रीपद भूषवले आहे
त्यामुळे काव्या एका चांगल्या व मोठ्या घराण्यातील तरूणी आहे. सनरायझर्स हैदराबादचे सामने जेव्हा-जेव्हा असतात त्यावेळी काव्या आपल्या संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमध्ये येत असते. परंतु यंदाच्या ऑक्शनमध्ये काव्याचे वेगळेच रुप बघायला मिळाले. काव्याने इशानला आपल्या संघात घेण्यासाठी चक्क अंबानींबरोबरच पंगा घेतल्याचे पाहायला मिळाले.
जरी तिला ईशानला आपल्या संघात घेता आले नसले तरी तिने मुंबई इंडियन्सशी घेतलेला पंगा सर्वांनाच भावला. यामुळेच काव्या दिवसभर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती.