लालू प्रसादांना कोर्टाचा झटका

देशातील सर्वात मोठ्या ९५० कोटी रुयांच्या चारा घोटाळ्याचा (डोरांडा ट्रेझरीमधून १३९.३५ कोटी रुपयांचा अपहार) हा निकाल आज आला. विशेष सीबीआय कोर्टाने राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव ( lalu prasad yadav convicted) यांच्यासह ७५ आरोपींना दोषी ठरवले आहे. त्याचबरोबर २४ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी २१ फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. कोर्टाने दोषी ठरवताच पोलिसांनी लालू प्रसाद यादव यांना ताब्यात घेतले आहे. लालू यादव यांना तुरुंगात न पाठवण्यात रिम्समध्ये पाठवण्याची विनंती त्यांच्या वकिलांनी अर्जद्वार केली आहे. यावर दुपारी २ नंतर कोर्टात सुनावणी होणार आहे.
लालू प्रसाद यादव यांना कोर्टाने दोषी ठरवल्याची माहिती समोर येताच पाटण्यापासून रांचीपर्यंतच्या त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे. कोर्टाचा परिसर आरजेडीच्या नेत्यांनी मोठी गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे. कोर्ट आज ३ वर्षांपेक्षा कमी कालवधीची शिक्षा काही आरोपींना सुनावेल, असे सांगण्यात येत आहे. तर लालूंसह १० आरोपींना स्वतंत्रपणे शिक्षा सुनावण्यात येणार आहे. यामुळे लालूंना ३ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास होऊ शकतो, असे मानले जात आहे. लालू यादव यांच्या शिक्षेच्या प्रश्नावर २१ फेब्रुवारीला निर्णय होईल, असे कोर्टाचे वरिष्ठ वकील राजतिक प्रसाद यांनी सांगितले. त्यांना मेडिकल टर्मवर रिम्समध्ये हलवल्याची चर्चा आहे.
याआधी लालूंना चारा घोटाळ्याच्या चार प्रकरणांमध्ये (देवघरमधील एक, दुमका कोषागारातील दोन आणि चाईबासा कोषागाराशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये) दोषी ठरवण्यात आले आहे. याआधीच्या सर्व खटल्यांमध्ये ते जामिनावर बाहेर होते. मात्र कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात जावे लागणार आहे.
विशेष सीबीआय न्यायाधीश एस.के. शशी यांच्या कोर्टाने युक्तिवादाच्या समाप्तीनंतर 29 जानेवारीला निकालाची तारीख १५ फेब्रुवारी ही निश्चित केली होती. सर्व आरोपींना प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. सुनावणीला हजर राहण्यासाठी लालू दोन दिवसांपूर्वी १३ फेब्रुवारीला रांचीला पोहोचले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *