अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न;

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी अजित डोवाल यांच्या सुरक्षेसंदर्भातील मोठा गोंधळ समोर आलाय. आज म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी एक अज्ञात व्यक्तीने कारसहीत अजित डोवाल यांच्या सरकारी बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीला रोखलं आणि मोठा अनर्थ टळला. या व्यवक्तीला सध्या दिल्ली पोलिसांच्या विशेष तुकडीच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.

सकाळी घडलेल्या या प्रकरणानंतर संबंधित व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेऊन दिल्ली पोलिसांच्या विशेष टीमकडे तपासाठी सोपवलं आहे. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा इसम आपल्या शरीरामध्ये चीप असल्याचं सांगत होता. मला कंट्रोल केलं जात असल्याचा दावा या व्यक्तीकडून केला जात होता. मात्र तपासामध्ये या व्यक्तीच्या शरीरामध्ये कोणतीही चीप आढळून आली नाही, असं झी न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.
अटक करण्यात आलेली व्यक्ती ही कर्नाटकमधील बंगळुरुची आहे. दिल्ली पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकाबरोबरच विशेष पथकाककडून आता या व्यक्तीची चौकशी सुरु आहे.

दहशतवाद्यांपासून धोका…
भारताचे जेम्स बॉण्ड नावाने अजित डोवाल यांना ओळखलं जातं. ते पाकिस्तान आणि चीनविरोधात भारताचे सुरक्षा धोरण ठरवणाऱ्या महत्वाच्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. डोवाल यांना अनेक दहशतवादी संघटनांपासून धोका आहे. मागील वर्षी जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी डोवाल यांच्या कार्यालयाची पहाणी केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणानंतर डोवाल यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

कोण आहेत डोवाल?
अजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस कॅडरचे अधिकारी आहेत. सैन्याकडून देण्यात येणार्‍या किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलीस अधिकारी आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते.

> २०१४ सालच्या निवडणुकांदरम्यान त्यांची भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नेमणूक करण्यात आली होती.

> १९९९ साली कंधारमध्ये इंडियन एअरलाइनचे आयसी ८१४ विमान अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

> १९८४ मध्ये खलिस्तानी आतंकवादीविरोधात चालवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका निभावली, यात ते सीक्रेट एजेंट बनून रिक्षावाल्याच्या पेहराव करून सुवर्ण मंदिरात गेले होते.

> उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.

> इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तब्बल ३३ वर्ष अधिकारी पदावर जम्मू कश्मीर, पंजाब येथे काम केले आहे.

> २०१४ पासून ते प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *