विराटच्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी धक्का
(sports news) आयपीएल स्पर्धेच्या मेगा ऑक्शननंतर (IPL 2022 Mega Auction) सर्व टीम तयार झाल्या आहेत. आता त्यांना आगामी आयपीएल स्पर्धेचे वेध (IPL 2022) लागले आहेत. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएल स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) टीमला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा प्रमुख खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आयपीएलमधील सुरूवातीच्या मॅच खेळणार नाही. ग्लेन मॅक्सवेल पुढच्या महिन्यात त्याची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमनशी (Vini Raman) लग्न करणार आहे.
मॅक्सवेलला आरसीबीने या ऑक्शनपूर्वीच रिटेन केले आहे. आगामी कॅप्टन म्हणून त्याच्या नावाची चर्चा आहे. त्याचवेळी तो स्पर्धेच्या सुरूवातीला खेळणार नसल्यानं आरसीबीला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाची टीम या महिन्याच्या शेवटी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे.
तब्बल 24 वर्षांनी ही टीम पाकिस्तानचा दौरा करणार आहे. ऑस्ट्रेलिया टीम या दौऱ्यात 3 टेस्ट, 3 वन-डे आणि 1 टी20 सामना खेळणार आहे. वन-डे आणि टी20 टीमचा सदस्य असलेला मॅक्सवेल या दौऱ्यावर देखील जाणार नाही. त्याने ‘फॉक्स क्रिकेट’ शी बोलताना या बातमीला दुजोरा दिला आहे. (sports news)
‘मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी (CA) यापूर्वी लग्नाच्या तारखेबाबत चर्चा केली होती. त्यावेळी लग्नामुळे एकही सीरिज मिस होणार नसल्यानं मी आनंदी होतो. पण, त्यानंतर कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. अचानक झालेल्या बदलामुळे मी पाकिस्तान विरूद्धच्या सीरिजमध्ये खेळू शकणार नाही.’ असे मॅक्सवेलने स्पष्ट केले. IPL Auction 2022 : क्रिकेटपटूचं आयुष्य बदललं, आता वडिलांना बूट पॉलिश आईला बांगड्या विकाव्या लागणार नाहीत! आयपीएल स्पर्धेच्या सुरूवातीच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाचे प्रमुख खेळाडू पाकिस्तान दौऱ्यामुळे अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. डेव्हिड वॉर्नर, जोश हेजलवूड, पॅट कमिन्स, मार्कस स्टॉईनिस हे ऑस्ट्रेलियन खेळाडू पाकिस्तान दौऱ्यामुळे सुरूवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर होऊ शकतात.