मार्चमध्ये १३ दिवस बँंक बंद; जाणून घ्या बँंक हॉलिडेची सविस्तर यादी

मार्च महिन्यात सण उत्सव यामुळे जवळपास १३ दिवस बँक हॉलिडे असणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या पत्रकानुसार देशभारतील विविध राज्यांमध्ये १३ दिवस बँका बंद असतील. ग्राहकांना या बँक हॉलिडेचे वेळापत्रक पाहून बँकिंग कामाचे नियोजन करावे लागेल. (List Of Bank Holiday In March 2022)
रिझर्व्ह बँकेने मार्च महिन्यातील बँक हॉलिडेची यादी वेबसाईटवर जारी केली आहे. त्यानुसार मार्च महिन्यात १३ दिवस बँका बंद राहतील. १२ आणि १३ मार्च रोजी दुसरा शनिवार -रविवार आणि २६ मार्च आणि २७ मार्च रोजी चौथा शनिवार-रविवार यांचा समावेश आहे.
चा चुराडा
१ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त बँकांना पूर्वोत्तर राज्ये, कोलकाता, नवी दिल्ली, पणजी, पटना आणि शिलॉंग सोडून उर्वरित भारतात बँकांना सुट्टी असेल. ३ मार्च रोजी गंगटोकमध्ये बँका बंद असतील. ४ मार्च रोजी आयजोलमध्ये बँकाना रजा असेल. ६ मार्च रोजी रविवार साप्ताहिक सुट्टी असेल. १२ आणि १३ मार्च रोजी दुसरा शनिवार -रविवार असल्याने सलग दोन दिवस बँका बंद राहतील.

होळी निमित्त १७ मार्च रोजी उत्तर भारतात डेहराडून, कानपुर, लखनऊ, रांची या शहरात बँकांना रजा असेल. १८ मार्च रोजी धुळवडीनिमित्त बंगळुरू, भूवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची , कोलकाता, तिरुवनंतरपूरम वगळता इतरत्र बँकांना सुट्टी असेल.
१९ मार्च रोजी होळीच्या दुसऱ्या दिवशी स्थानिक उत्सवानिमित्त भूवनेश्वर, पटना, इंफाळ येथे बँकांना सुट्टी असेल. २० मार्च रोजी रविवार आठवड्याची सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. २२ मार्च बिहार दिवस निमित्त पटनामध्ये बँका बंद राहतील. २६ मार्च आणि २७ मार्च रोजी चौथा शनिवार-रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *