इचलकरंजी : प्रेमसंबंधाला विरोध, पत्नी आणि मुलीने मिळून केला खून

दोघींच्या बाहेर असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध व त्यातून होणार्‍या वादातून शांतीनाथ केटकाळे यांचा पत्नी सुजाता व मुलगी साक्षी या दोघांनी मिळून खून केल्याचा पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याची माहिती आज शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली. सुजाता शांतीनाथ केटकाळे ( वय 36) आणि साक्षी शांतीनाथ केटकाळे (वय 21) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. कबनूर येथे राहणारे शांतीनाथ केटकाळे यांचा लोखंडी कटावणी व बॅट तसेच चाकुने वार करून मंगळवारी रात्रीच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला.

धुळ्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, कल्याण भवनासमोर निदर्शने
खूनाच्या घटनेनंतर त्यांची पत्नी सुजाता आणि मुलगी साक्षी या दोघी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाल्या. त्यांनी हल्ल्याची घटना सांगितल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. मात्र हल्ल्यात जखमी झालेल्या शांतीनाथ केटकाळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. सुजाता व साक्षी या दोघांचीही कसून चौकशी करण्यात आली. शांतीनाथ केटकाळे यांची पत्नी सुजाता यांचे तसेच मुलगी साक्षी हिचे बाहेर प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधाच्या कारणावरून वारंवार वादविवाद होत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *