मंत्री नवाब मलिक ईडीच्या रडारवर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) ईडी (ED)च्या रडारवर असल्याचं दिसत आहे. ईडीचे पथक आज सकाळी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले आणि त्यानंतर नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडी कार्यालयात दाखल झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुन्या मालमत्तांच्या व्यवहारांच्या संबंधीत ही चौकशी केली जात आहे. मुंबईतील ईडीच्या कार्यालयात सकाळी सात वाजता नवाब मलिक दाखल झाले आहेत आणि त्यांची ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांची ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. सकाळी सात वाजल्यापासून ईडी कार्यालयात नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे.

सकाळी पाच वाजता ईडी अधिकारी मलिकांच्या घरी

सकाळी पाच वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिकांच्या घरी पोहोचले आणि त्यानंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक स्वत:हून ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे.

1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटातील गुन्हेगाराची आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींकडून नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जमीन खरेदी केली असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केला होता. काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करत इकबाल कासकरची ईडीने चौकशी केली होती.

इकबाल कासकर याच्या चौकशीनंतर आता नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडी अधिकाऱ्यांनी बोलावलं आहे. या जमीन व्यवहारात नवाब मलिक यांचा काही संबंध आहे का? या व्यवहारांच्या संबंधीच मलिकांना चौकशीसाठी ईडी अधिकाऱ्यांनी बोलावलं आहे का? या संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाहीये.

अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान सुरू

27 नोव्हेंबर रोजी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला सुद्धा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याप्रमाणे अडकवण्याचं कटकारस्थान सुरू असल्याचा खळबळजनक दावा केला होता. नवाब मलिक पुढे म्हणाले होते, कारमध्ये बसलेला व्यक्ती, गाडीचा नंबर सुद्धा समोर आला आहे. आम्ही या संदर्भातील तक्रार मुंबई पोलिसांत करणार आहोत आणि चौकशी करण्याची मागणी करणार आहे. या षडयंत्रामागे कोण आहे याची माहिती समोर यायला हवी. अनेक षडयंत्र माझ्याविरोधात झाले आहेत. या संदर्भातील अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्याबाबतही मी पोलिसांना माहिती देईल.

कारमध्ये बसलेला व्यक्ती, गाडीचा नंबर सुद्धा समोर आला आहे. आम्ही या संदर्भातील तक्रार मुंबई पोलिसांत करणार आहोत आणि चौकशी करण्याची मागणी करणार आहे. या षडयंत्रामागे कोण आहे याची माहिती समोर यायला हवी. अनेक षडयंत्र माझ्याविरोधात झाले आहेत. या संदर्भातील अनेक पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्याबाबतही मी पोलिसांना माहिती देईल. मला वाटतं की, अनिल देशमुख यांना ज्या प्रमाणे अडकवलं जात आहे त्याचप्रमाणे आता काही जण माझ्याविरोधात षडयंत्र करत आहेत. या संदर्भातील मला माहिती मिळाली असून पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. माझ्याविरोधात खोटी तक्रार केली जात आहे. या संदर्भातील माहितीही मुंबई पोलिसांना देणार आहोत असंही नवाब मलिक म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *