अमित ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिली महत्त्वाची जबाबदारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याकडे पक्षाने एक मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे (MNS appoints Amit Thackeray as President of Maharashtra Vidyarthi Sena) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काळात मुंबईसह राज्यातील इतरही महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकांपूर्वी मनसेने अमित ठाकरे यांच्याकडे दिलेली ही जबाबदारी खूपच महत्त्वाची मानली जात आहे.

आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद हे रिक्त होते. त्यामुळे या पदावर अमित ठाकरेंचीच नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी होत होती. अखेर आज मराठी भाषा दिनाच्या औचित्याने मनसेने अमित ठाकरे यांची या पदावर नियुक्ती केली आहे. या पदावर नियुक्ती करत मनसेने अमित राज ठाकरेंवर तरूण आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.मनसेने या संदर्भात एक अधिकृत पत्रक काढलं आहे. आपल्या पत्रकात म्हटलं, “आज ‘मराठी भाषा गौरव’ दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित राज ठाकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात येत आहे.”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यावर राज ठाकरेंनी मनसे विद्यार्थी सेनेची सुद्धा स्थापन केली. विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद आदित्य शिरोडकर यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. मात्र, आदित्य शिरोडकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसे विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद रिक्त होतं. आता या पदावर अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *