कीवमध्ये इमारतीवर मिसाईल हल्ला; ‘तो’ फोटो शेअर करत युक्रेनने करुन दिली 9/11 हल्ल्याची आठवण
रशियाला गेले महिनाभर आव्हाने देणाऱ्या अमेरिकेने हल्ल्या झाल्यानंतर युक्रेनच्या मदतीला जाण्यास नकार दिला होता. यामुळे अमेरिकेची पुरती नाचक्की झाली होती. रशियाने कोणी मध्ये आल्यास इतिहास बदलून ठेवण्याचा इशारा दिला होता. अमेरिकेने युक्रेनला युद्धासाठी मोठी मदत केली आहे. फ्रान्सकडून शस्त्रास्त्रांचा साठा युक्रेनच्या दिशेने रवाना झाला आहे. अशातच युक्रेनला रशियासोबत लढण्यासाठी आणखी शस्त्रास्त्रांची तसेच दारुगोळ्याची गरज भासणार आहे. त्यातच युक्रेनचे प्रचंड नुकसान रशियाने केले आहे. यामुळे ही शस्त्रे विकत घेण्यासाठी युक्रेनला अमेरिकेने 350 दशलक्ष डॉलर्सची मदत देऊ केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाद आता चिघळला आहे. रशिया आधुनिक शस्त्रे, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे.
कीवमधील इमारतीवरही क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनच्या गृह मंत्रालयाने सोशल मीडियावर अमेरिकेचा 9/11 हल्ला आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनवरील हल्ल्यांची तुलना करणारे फोटो शेअर केले आहेत. फोटोत अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या (World Trade Centre) ट्विन टॉवर्सवर 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर निघलेला धूर दिसत आहे. तसंच फोटोत कीवमधील रशियन हल्ल्यादरम्यान, क्षेपणास्त्राचा हल्ला (Missile Attack) झाल्यानंतर एक कोसळताना इमारत दिसत आहे. युक्रेनने कीवमधील (Kyiv) इमारतीवरील रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याची तुलना अमेरिकेच्या 9/11 शी केली आहे.