पुन्हा कोरोनाचं थैमान; Lockdown लागण्याची चिन्ह

महाराष्ट्रासह भारतात आता कोरोनाची तिसरी लाट जवळपास ओसरली आहे. यामुळे आता सर्व व्यवहार, सेवा पूर्ववत होताना दिसत आहेत. मात्र, त्याच दरम्यान आता हाँगकाँग (Hong Kong)मधून धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. कारण, कोरोनामुळे हाँगकाँगमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. कोरोना बाधित (corona cases) मृतकांच्या संख्येत इतकी वाढ झाली आहे की मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयात जागा शिल्लक राहिली नाहीये.

हाँगकाँगमधील बहुतांश रहिवाशांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाहीये. संसर्गाची वाढती संख्या पाहता स्थानिक अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची शक्यता नाकारली नाहीये.

हाँगकाँग शहरातील सार्वजनिक डॉक्टर्स असोसिएशनचे प्रमुख टोनी लिग म्हणाले, रुग्णालयात अपघात आणि आपत्कालीन कक्षात मृतदेह नेण्याची वाट पहावी लागत आहे. शवागर आणि इतर सुविधा कमी पडताना दिसत आहेत.

लसीकरणाची संख्या इतर ठिकाणी वाढत असताना हाँगकाँगमध्ये लस न घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, अनेकांनी दुष्परिणामांच्या भीतीने लसीकरणाला नकार दिला आहे. 2020च्या सरकारी आकडेवारीनुसार, हाँगकाँगमध्ये प्रत्येक महिन्यात सरासरी 4 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 71 हजारांहून अधिक आहे.

लॉकडाऊन लावण्याचा विचार

सोमवारी हाँगकाँगमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत (corona cases)वाढ झाल्याचं दिसून आलं. सोमवारी 34,466 नव्या रुग्णांची नोंद झाली तर मृतकांचाही आकड वाढला. यामुळे लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी नाकारली नाहीये. यापूर्वी हाँगकाँगमधील स्थानिक नेत्यांनी लॉकडाऊनला अवास्तव म्हटलं होतं. हाँगकाँगमध्ये ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. दैनंदिन बाधितांच्या संख्येत चौपट वाढ होत आहे.

शहरातील आरोग्य संरक्षण केंद्राचे प्रमुख वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “दर तीन दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. आम्हाला वाटते की, बाधितांची संख्या वाढतच जाईल.” सोमवारी शहरात 87 लोकांचा मृत्यू झाला त्यापैकी 67 नागरिकांनी कोरोना बाधितांची लस घेतली नव्हती. त्यामुळे आता सरकार अशा उपाययोजना लागू करु शकते की ज्यामुळे नागरिकांना घरी राहण्यास सांगितले जाऊ शकते असंही आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

हाँगकाँगच्या आरोग्यमंत्री सोफिया चॅन यांनी सोमवारी एका रेडिओ कार्यक्रमादरम्यान सांगितले की, लोकांची रेलचेल करण्याची क्षमता कमी करण्यासाठी लॉकडाऊनच्या शक्यतेवर सरकार चर्चा करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *