कोल्‍हापूर : नागरिकांना सहन करावा लागणार मोठा त्रास

कोल इंडिया आणि महाजनको यांच्यातील विसंवादामुळे राज्यात कोळसा टंचाई निर्माण झाली आहे. महाजनकोकडे केवळ दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा (coal) शिल्लक असल्याने राज्यासमोर भारनियमनाचा धोका आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर भारनियमन उद्भवल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम उद्योग क्षेत्रावर होत आहे. युक्रेनमधून अ‍ॅल्युमिनियम आणि कोळशाची मोठ्या प्रमाणात आयात होते. त्यावर परिणाम झाला आहे.

त्यातच केंद्र सरकारच्या कोल इंडियाने महाजनकोस कोळसा देण्यास असमर्थता दाखवली आहे. महाजनको कोल इंडियाचे तब्बल 20 ते 22 हजार कोटी रुपये देणे आहे. त्याचबरोबर महावितरणची ग्राहकांकडे हजारो कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्याची वसुली महावितरणसाठी डोकेदुखी बनली आहे.

कोल इंडियाने कंपनीने पैसे मिळत नसल्याने कोळसा (coal) पुरवठ्यात काही प्रमाणात कपात केली आहे. दोन दिवसांत पैशाची जमवाजमव करून काही रक्कम दिली तरच पुढील काही दिवसांसाठी कोळसा मिळण्याची आशा आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात भारनियमन नाही

वसुली, वीज गळती आणि वीज चोरी यानुसार भारनियमनासाठी गट तयार करण्यात आले आहेत. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे अशा गटांत या सूत्रानुसार भारनियमन केले जाते. भारनियमन सुरू झाल्यास जे या गटापासून सुरुवात होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ए पासून डी पर्यंत गट असल्याने भारनियमनाचा त्रास होणार नाही, असे एका जबाबदार अधिकार्‍याने सांगितले.

कोळशाचा दोन दिवसांचा साठा

दोन दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक असल्याने महावितरण आणि महानिर्मितीचे अधिकारी हैराण झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *