पवारांनी केली पुण्याची तुलना युक्रेनसोबत

युक्रेन येथील विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात काही प्रमाणात यश मिळालंय. तरीही अजून अनेक विद्यार्थी तेथे अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आणखी प्रयत्न आवश्यक आहेत, असे पवार म्हणाले.
त्या विद्यार्थ्यांना तातडीने भारतात परत आणण्यासाठी टीका टिपण्णी करण्याची आवश्यकता नाही. यावेळी सर्वानी सोबत मिळून काम करण्याची गरज आहे. युक्रेनची सीमा गाठण्यासाठी किमान सहा ते सात तास चालावे लागत आहे. मात्र, बॉम्बहल्याची त्या विद्यार्थ्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे ते घरातच थांबले आहेत.
घाबरलेल्या त्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. ही मुले कशी लवकर येतील याकडे पहायला हवे. त्यांच्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. मी संरक्षण मंत्री असताना 2 ते 3 वेळा तिथे गेलो होतो. स्वस्त आणि सुलभ शिक्षणामुळे आपले हजारो विद्यार्थी तिकडे वैद्यकीय शिक्षणासाठी गेली आहेत. युक्रेन हे पुण्याप्रमाणेच ज्ञानाच आणि शिक्षणाचं माहेरघर आहे, असे पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *