धोनीला मिळाली गुड न्यूज
भारताचा जलद गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या टी-२० मालिकेत दुखापत झाली होती. दीपकला क्वाड्राइसेप मसल्सची दुखापत झाल्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला खेळता आले नाही. दीपकवर शस्त्रक्रिया करावी लागेल असा सल्ला दिला होता. यामुळेच २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये तो खेळेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्ज (chennai super kings)ने त्याला १४ कोटींना खरेदी केले होते.
Deepak Chahar Injury News: महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. संघातील आघाडीचा गोलंदाज दीपक चहरला लवकरच फिट होणार आहे.
महेंद्र सिंह धोनी
दीपकला क्वाड्राइसेप मसल्सची दुखापत झाल्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला खेळता आले नाही. दीपकवर शस्त्रक्रिया करावी लागेल असा सल्ला दिला होता. यामुळेच २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये तो खेळेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्ज (chennai super kings)ने त्याला १४ कोटींना खरेदी केले होते.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दीपक चहरच्या दुखापतीवर आता शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. यामुळे धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण एप्रिलच्या मध्यापर्यंत तो फिट होईल आणि आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध होईल. दीपक सध्या बेंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीत रिहॅबमध्ये आहे. NCAमध्ये तो ८ आठवड्यांपर्यंत असेल. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जने सुरतमध्ये आयपीएलची तयारी सुरू केली आहे. आता संघाची इच्छा असेल की पुढील काही आठवड्यात तो संघासोबत जोडला जाईल.
चेन्नई सुपर किंग्जला स्वत: दीपकच्या फिटनेसवर लक्ष्य द्यायचे आहे. सुरुवातीला MRI स्कॅन केल्यानंतर दीपकवर शस्त्रक्रिया करावी लागू शकते असे म्हटले गेले. या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup) होणार आहे, त्यामुळे दीपक शस्त्रक्रिया टाळत आहे. टी-२० मधील त्याचा समावेश भारताचा मुख्य जलद गोलंदाजांमध्ये होतो.
आयपीएलच्या १५व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची पहिली लढत २६ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे. लिलावाच्या आधी चेन्नईने दीपकला रिटने केले नव्हते. पण मेगा लिलावात तो दुसऱ्या क्रमांकाचा महाग खेळाडू ठरला. आयपीएलच्या लिलावाच्या इतिहासात तो सर्वात महाग जलद गोलंदाज ठरला. २०१७ मध्ये पुणे संघाकडून खेळल्यानंतर २०१८ पासून धोनीच्या नेतृत्वाखाली CSKकडून खेळतोय.