राज ठाकरे म्हणाले मी पुन्हा येईन

मी पुन्हा येईन, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी (दि.10) सांगितले.मनसेच्या पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे म्हणाले की, मी पुन्हा पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहे. त्यावेळी सविस्तरपणे पत्रकारांशी बोलणार आहे. आज मी काही बोलणार नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा येणार, हा माझा शब्द आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त शहर परिसरात मोठमोठे होर्डिग व ध्वज लावण्यात आले होते. ढोल ताश्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले.
भगवे फेटे घातलेले पदाधिकारी व कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. क्रेनच्या सहायाने भला मोठा हार घालून त्याचे शहरात स्वागत करण्यात आले. तसेच, चांदीची गदा व त्यांची चित्राच्या प्रतिकृती त्यांना भेट देण्यात आल्या. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत त्यांनी छायाचित्रे काढून घेत गप्पा मारला.
या वेळी मनसेचे नेते अनिल शिदोरे, अ‍ॅड. गणेश सातपुते, किशोर शिंदे, रणजित शिरोले, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष सचिन चिखले आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *