धरणगूत्ती येथे तलाठी अक्षय कोळी यांचा वाढदिवस जोरात साजरा..विविध मान्यवरांची उपस्थिती
शिरोळ तालुक्यातील धरणगूत्ती लक्ष्मी नगर येथे राहत असणारे अक्षय अनिल कोळी यांचा वाढदिवस अगदी उत्साहाने साजरा करण्यात आला,ते सद्या चंदगड येथे तलाठी या पदावर काम करीत आहेत, त्यांचा 26 वा वाढदिवस व जागतिक महिला दिन या निमित्ताने धरणगुत्ती लक्ष्मी नगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले,सकाळी अनाथ आश्रम व वृद्ध आश्रम यास जेवण वाटप करण्यात आले,दुपारी रांगोळी स्पर्धा आणि संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,रांगोळी स्पर्धेसाठी पाहिलं बक्षीस कै.सहदेव शिवा कांबळे यांच्या कडून 1501 रू तर दुसरे बक्षीस शिवराज पवार यांच्या कडून 1001 तर तिसरे बक्षीस निखिल केसरे यांच्या कडून 501 होते,रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा संजय पाटील हिला मिळाले तर दुसरे बक्षीस स्नेहल प्रदीप शेवाळे व तिसरे बक्षीस साक्षी श्रेणिक खराडे हिला मिळाले,
संगीत खुर्ची स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 701 रू.प्रमोद पखंडी,दुसरे बक्षीस 501 रू राकेश कांबळे व तिसरे बक्षीस 301 रू.सतीश कांबळे यांच्या कडून देण्यात आले होते,या स्पर्धत प्रथम क्रमांक कु.सुप्रिया नरळे,दुसरे बक्षीस साक्षी खराडे,तिसरे बक्षीस सौ.संगीता चौगुले यांनी मिळाले,यानंतर धरणगूत्ती अंगणवाडी क्रमांक 75 यास खुर्ची वाटप करण्यात आले,त्यानंतर स्पर्धेस बक्षीस देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, व रांगोळी स्पर्धेसाठी सहभाग घेणाऱ्या महिला व मुलींचा ही येथे सत्कार करण्यात आला,यानंतर अक्षय कोळी यांचा वाढदिवस अगदी जोरात साजरा करण्यात आला, केक कापून फटाकेची आतिषबाजी करून परिसर दणाणून गेला,
या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली,जयसिंगपूर कॉलेजचे प्राध्यापक तथा जयहिंद डिजिटल न्यूज संपादक डॉ.प्रभाकर माने सर, स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एजाज मुजावर कोल्हापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भागवत जांभळे,मातोश्री सोशल फाऊडेशन चे संस्थापक जीवन आवळे,धरणगुत्ती गावचे माजी उपसरपंच शिवाजीराव जाधव,धरणगुत्ती चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेखर पाटील साहेब मनसे,मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय आबा भंडारी,मनसे जयसिंगपूर शहर अध्यक्ष लखन उर्फ निलेश भिसे,भाजपा चे पंकज गुरव,राहुल मेस्त्री,बाळासाहेब केरीपाळे,अजित वराळे आदी मान्यवर उपस्थित होते,
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली,महिला दिनामुळे महिला व मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली,या कार्यक्रमास मोलाची भूमिका अमोल लोहार,राहुल सनदी,युवराज कारंडे – माळी,वैभव कोळी,शुभम सुतार,प्रमोद पखंडी,सौरभ देवकुळे,कुंदन देवकुळे,शुभम पाटील,दिग्विजय पवार,हर्षद कांबळे,सचिन सनदी,बज्या उर्फ आदेश कांबळे,स्वप्नील रजपूत,अनिकेत कांबळे यासह शिरोळ तालुक्यातील आणि लक्ष्मीनगर मधील मित्र मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा डॉ. प्रभाकर माने सर यांनी केले,तर रांगोळी स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून कुमारी नेहा राठोड यांनी मोलाची भूमिका बजावली, या कार्यक्रमाचे नेटके पणाने नियोजन केल्या बद्दल निर्भिड पत्रकार रोहित जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.