अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी विराट झालाय इतका आतूर?

(sports news) श्रीलंकेविरूद्धची दुसरा टेस्ट सामना बंगळूरूमध्ये खेळला जाणार आहे. हा डे-नाईट टेस्ट सामना असणार आहे. या टेस्टमध्ये विजय मिळवून टी-20 नंतर ही सिरीज देखील आपल्या नावे करण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा आहे. तर दुसरीकडे भारतीय माजी कर्णधार विराट कोहली देखील हा सामना खेळण्यासाठी खूप उत्सुक दिसतोय. हा विराटचा 101 वा सामना असणार आहे.

सामन्याच्या एका दिवसापूर्वी कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट केलं आहे. या पोस्टमध्ये विराटने काही फोटो शेअर केले आहेत. याला पोस्टमध्ये कोहली म्हणतो, आम्ही बंगळूरूला पोहोचलो आहे आणि मी पिंक बॉल टेस्ट खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे. सामना खेळण्यासाठी आता मी वाट पाहू शकत नाही.

कोहलीच्या करियरमधील हा 101वी टेस्ट

आजचा सामना कोहलीच्या करियरमधील 101 वा सामना आहे. त्याचसोबत बंगळूरूचं एम चिन्नस्वामी स्टेडियम विराट कोहलीचं दुसरं होमग्राऊंड आहे. अशा परिस्थितीत कोहलीही या मैदानावर कमबॅक करण्यासाठी आनंदात आहे. कोहलीला गेल्या अडीच वर्षांपासून क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेलं नाही. अशा स्थितीत त्याला या शतकाचा दुष्काळ दुसऱ्या घरच्या मैदानावर संपवायचा आहे. (sports news)

विराट कोहलीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 70 शतकं झळकावली आहेत. मुख्य म्हणजे कोहलीने शेवटचं शतक डे-नाईट टेस्टमध्ये झळकावलं होतं. त्यामुळे आजच्या सामन्यात विराट कोहली शतक झळकावेल अशी चाहत्यांना आशा आहे.

2019मध्ये बांग्लादेशविरूद्ध झालेल्या डे-नाईट टेस्ट सामन्यात शतक ठोकलं होतं. कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर हा सामना रंगला होता. त्यावेळी कोहली टीम इंडियाचा कर्णधार होता आणि त्याने 136 रन्सची खेळी खेळली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *