संजय राऊतांनी एकांतात बडबडण्याची सवय लावावी, राज ठाकरेंचं प्रत्युत्तर

मनसेचे (MNS) एकमेव आमदार राजू पाटील यांच्या दिवा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्दघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातील सभेत सेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची नक्कल केली होती, त्यावर संजय राऊत यांनी मिमिक्री करून राजकारण होत नाही असा सल्ला राज ठाकरे यांना दिला होता. यावर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी, असा टोला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्यातील मनसे पदाधिकारी आणि मनसे च्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. याचाच भाग म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच राज ठाकरे यांनी उद्दघाटन केलं आहे. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत,अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे उपस्थित होते.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना प्रतिउत्तर देत, संजय राऊत यांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावावी असा टोला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. आता संजय राऊत नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *