‘या’ दोन दिग्गज खेळाडूंविरोधात गुन्हा दाखल

(sporta news) रशियन टेनिस प्लेअर मारिया शारापोव्हा (Maria Sharapova) आणि माजी फॉर्म्युला वन ड्रायव्हर मायकेल शूमाकर (Michel Schumakar) यांना कोण ओळखत नाही? त्यांच्या क्षेत्रातले दिग्गज म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे. पण या जगप्रसिद्ध खेळाडूंच्या विरोधात भारतात गुन्हा दाखल झाला आहे. मारिया शारापोव्हा, मायकल शूमाकरसह अन्य 11 जणांविरोधात गुरुग्राम पोलिसांनी फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.

एका महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील छत्तरपूर मिनी फार्ममध्ये राहणाऱ्या शेफाली अग्रवाल (Shafali Agarwal) हिनं याबद्दलची एक तक्रार केली होती. शारापोव्हा आणि शूमाकर या बांधकाम प्रकल्पाचे प्रमोटर्स असल्याने त्यांच्याविरुद्ध शेफाली यांनी तक्रार दिली आहे.

शारापोव्हाचं नाव दिलेल्या एका प्रोजेक्टमध्ये एक अपार्टमेंट तक्रारदार शेफाली (Shafali Agarwal) यांनी बुक केलं होतं असं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रोजेक्टमधील एका टॉवरचं नाव शूमाकरच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. 2016 पर्यंत ही योजना पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण या प्रोजेक्टचं काम सुरुच झालं नाही. त्यामुळे या जगप्रसिद्ध व्यक्तींवर फसवणुकीत सहभागी झाल्याचा आरोप शेफाली यांनी केला आहे. त्यापूर्वी शेफालीने गुरुग्रामच्या एका कोर्टात एमएस रियलटेक डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात तक्रार दाखल केली होतीच. मारिया शारापोव्हा आणि मायकेल शूमाकरनं जवळपास 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तिनं या तक्रारीत केला होता.

शेफाली आणि तिच्या नवऱ्याने गुरुग्राममधील सेक्टर 73 मध्ये शारापोव्हाच्या नावाने असलेल्या सोसायटीत एक निवासी अपार्टमेंट बुक केलं होतं. पण डेव्हलपर कंपन्यांनी आपल्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवण्याचं अमिष दाखवून आपल्याला लुबाडलं असा आरोप शेफाली यांनी कोर्टाच्या समोर केला आहे. जाहिरातींमधून आपल्याला या प्रोजेक्टबद्दल माहिती मिळाली आणि योजनेचे फोटो पाहिल्यानंतर त्यांनी कंपनीच्या मॅनेजमेंटशी संपर्क साधला. या कंपनीनं आपल्याला अनेक खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप शेफाली यांनी केला आहे.

या प्रोजेक्टचे प्रमोटर म्हणून शारापोव्हा आणि शूमाकर यांची नावं देण्यात आली होती. त्यांनी कट रचून ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारिया शारापोव्हानं या साईटचा एकदा दौरा केला होता आणि या साइटवर स्पोर्ट्स स्टोअर तसंच एक टेनिस अकादमी उघडण्याचं आश्वासन दिलं होतं. मारिया शारापोव्हा या योजनेला प्रोत्साहन देत असल्याचं ब्रोशरमध्ये म्हटल्याचं त्यांनी सांगितलं. (sporta news)

तसंच तिनं खोटी आश्वासनं दिली. इतकंच नाही तर ग्राहकांसोबत तिनं एक डिनर पार्टीही केली होती. मात्र हे ज्या प्रोजेक्टसाठी चाललं होतं तो प्रोजेक्ट कधी अस्तित्वातच आला नाही असा आरोप केला जात आहे. तर बादशाहपूर पोलीस स्टेशनमध्ये मारिया शारापोव्हा आणि मायकल शूमाकरच्या विरोधात IPC चे कलम 34, 120-बी गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणं, 406- विश्वासघात आणि 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत मोठी नावं आल्यानं साहजिकच सगळीकडे आता हा प्रोजेक्ट आणि तक्रारींची चर्चा सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *