ऑस्ट्रेलियाची उपांत्यफेरीत धडक, टीम इंडियावर ६ विकेट राखून दणदणीत विजय

ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेट्सने पराभव केल्यानंतर भारत आता ‘करो या मरो’ स्थितीत आहे. मेग लॅगिंग हिच्या ९७ धावांच्या खेळीने ऑस्ट्रेलियाने भारतावर सहा विकेट्सने मात केली. मेग लॅनिंग हिने १०७ धावांमध्ये ९७ धावांच्या खेळी केली. भारताला वर्ल्डकपमध्ये आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी पुढील सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.

क्रिकेट महिला वर्ल्ड कपमधील आजचा साखळी सामना भारतासाठी महत्त्‍वपूर्ण आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघास २७८ धावांचे आव्‍हान दिेले आहे. कर्णधार मिताली राज हिची दमदार ६८ धावांची खेळी, यास्‍तिका भाटिया ५९ आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौरच्‍या ५७ धावांमुळे संघ सन्‍मानजनक धावसंख्‍येपर्यंत पोहचवले. ऑस्‍ट्रेलियाच्‍या डार्सी ब्राउन हिने ३ बळी घेतले. दरम्‍यान, ऑस्‍ट्रेलियाने आपल्‍या डावाची दमदार सुरुवात केली आहे. केवळ १५ षटकांमध्‍ये ८८ धावा पूर्ण केल्‍या आहेत. सलामीची जोडी लिसा हीली ५० तर रेचेल हेन्स ३४ धावांवर खेळत आहे.
क्रिकेट महिला वर्ल्डमधील १८ वा सामना ऑकलंडमधील ईडन पार्कवर खेळला जात आहे. ऑस्‍ट्रेलियाने नाणेफेक जिंकली. फलंदाजीसाठी मैदानाता उतरलेल्‍या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. चौथ्‍या षटकामध्‍ये स्‍मृमि मंधाना ११ चेंडूमध्‍ये १० धावांवर बाद झाली. डार्सीने तिला तंबूत पाठवले.
संघात पुन्‍हा एकदा स्‍थान निर्माण करणार्‍या शेफाली वर्मा १६ चेंडूत केवळ १२ धावा करुन बाद झाली. यानंतर कर्णधार मिताली राज हिने दमदार ६८ धावांची खेळी केली. तिने कारकीर्दीतील ६३ वे अर्धशतक पूर्ण केले. तर वन डेमधील १० वे अर्धशतक आपल्‍या नावावर केले. तिला यास्‍तिका भाटियाची चांगली साथ मिळाली. यास्‍तिकाने ८३ चेंडूत ५९ धावा फटकावल्‍या. तिने मिताली आणि यास्‍तिका या दोघींनी तिसर्‍या विकेटसाठी १५४ चेंडूत १३० धावा केल्‍या.
यष्‍टीरक्षक ऋचा घोष (८) आणि स्‍नेह राणा (१) दोघींनी झटपट विकेट गेल्‍यानंतर सातव्‍या विकेटसाठी हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्रकर ४७ चेंडूमध्‍ये ६४ धावांची भागीदारी केली.
ऑस्‍ट्रेलियाने आपल्‍या डावाची दमदार सुरुवात केली आहे. केवळ आठ षटकांमध्‍ये विनाबाद ५३ धाव फटकावल्‍या आहेत. लिसा हिली ४० तर रेचेल हेन्‍स २० धावांवर खेळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *