IPLच्या निमित्तानं शत्रू होणार एकमेकांचे मित्र? पाहा कोण आहेत हे खेळाडू
(sports news) IPL मध्ये असे काही खेळाडू आहेत जे एकमेकांचं तोंड पाहून कधीच खूश रहात नाही. अशा दोन खेळाडूंना आता आयपीएलमध्ये एकत्र खेळावं लागणार आहे. बऱ्याचदा हे एकमेकांमध्ये मैदानातही भिडल्याचे किस्से आहेत. मात्र तरीही एकसाथ त्यांना खेळावं लागणार आहे. अशा खेळाडूंबद्दल आज जाणून घेणार आहोत.
एकमेकांना पाहून कधीच खूश होत नाही हे खेळाडू
IPL 2022 मध्ये कृणाल पंड्या आणि शत्रू दीपक हुड्डा हे एकमेकांचं तोंड पाहून कधीच खूश होत नाहीत. हे दोघंही आता लखनऊ संघाकडून खेळताना दिसणार आहेत. लखनऊ संघाने कृणालवर 8.25 कोटींची बोली लावली होती. हार्दिक पांड्या गुजरात संघाकडून खेळताना दिसणार आहे. गुजरात कृणालला आपल्या संघात घेईल अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही.
कृणाल पांड्यावर लखनऊ, हैदराबाद आणि चेन्नईनं बोली लावली होती. गुजरातने एकदाच बोली लावली. मात्र शेवटी लखनऊ संघाने 8.25 कोटी देऊन कृणालला आपल्या संघात घेतलं. तर कृणालचा सर्वात मोठा शत्रू दीपक हुड्डाला 6 कोटी देऊन संघात घेतलं आहे.
कृणाल-दीपकमध्ये धूसफुस
दीपक हुड्डाने कृणाल पांड्यावर गंभीर आरोप लावला होता. कृणालने त्याला शिवीगाळ केल्याचा आरोप दीपकने केला. यामुळे त्याने 2021 मध्ये सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून या दोघांमध्ये धुसफूस आहे. (sports news)
कृणालने दीपक हुड्डाला करिअर संपवण्याची धमकी दिली होती. एवढं सगळं झाल्यानंतर हे दोघंही एकमेकांचं कधीही तोंड पाहू इच्छीत नसताना मात्र आता एकाच संघातून आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत.
दीपक हुड्डाने कृणालवर अपशब्द वापरल्याचाही आरोप केला आहे. कृणालमुळे मी निराश, दुःखी आणि दबावाखाली असल्याचं दीपक हुड्डानं म्हटलं होतं. या दोघांमधील वाद क्रीडा विश्वात माहीत आहे. आता एकमेकांचे शत्रू एकाच संघात राहून मित्र होणार की दुरावा वाढणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.