मा. श्री.सुरेश राजाराम दानवाडकर यांची पदोन्नती

प्रतिनिधी:- विजय पाटील मा. श्री.सुरेश राजाराम दानवाडकर यांनी आपल्या सेवेची सुरुवात ग्रामसेवक पदापासून केली होती.त्यांनी वेळोवेळी पदोन्नती मिळवून आज ते शिरोळ तालुक्याच्या कृषी अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी अशा दोन्ही पदाचा पदभार सांभाळत आहेत.त्यांनी मिळवलेल्या पदोन्नतीबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन ,कोल्हापूर जिल्हा यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.संजयसिंह चव्हाण साहेब व माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.इंद्रजित देशमुख साहेब यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित होते. सोबत कागलचे कृषी अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *