पीएम किसानसाठी घर बसल्या करा ‘ई-केवायसी’

उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ कोटी शेतकऱ्यांना खुषखबर देण्याच्या तयारीत आहेत. होळीच्या सणानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत ११ व्या टप्प्यातील २ हजार रूपये जमा केले जाणार आहेत. परंतु ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. एप्रिल-जुलैसाठी २ हजार रुपयांचा हप्ता खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी ई-केवायसी कशी पूर्ण करायची हे जाणून घेणे महत्वाचे आहे. पीएम किसान (PM Kisan) पोर्टलवर ई-केवायसी सुरू करण्यात आली आहे. मोबाइल किंवा लॅपटॉपवरून घरी बसून सहज ई-केवायसी करू शकता.
PM Kisan : ई-केवायसी प्रक्रिया
प्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
उजव्या बाजूला तुम्हाला eKYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
आता तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा आणि ओटीपी टाका.
त्यानंतर सर्व काही व्यवस्थित झाले तर eKYC पूर्ण होईल, अन्यथा Invalid येईल.
असे झाल्यास तुमचा हप्ता उशीर होऊ शकतो. तुम्ही ते आधार सेवा केंद्रावर दुरुस्त करून घेऊ शकता.
प्रत्येक आर्थिक वर्षात हप्ता दिला जातो. १ एप्रिल ते ३१ जुलै दरम्यान एप्रिल-जुलैचा हप्ता येतो. ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर दरम्यान जमा होतो. डिसेंबर-मार्चचा हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान जमा होताे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील १२.४८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ३१ मार्चपर्यंत उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात १० व्या हप्त्यासह डिसेंबर-मार्चचा हप्ता जमा होण्यास सुरूवात होईल.
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत (PM Kisan) केंद्र सरकार दरवर्षी २ हजार प्रमाणे तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये थेट हस्तांतरित केले जातात. आतापर्यंत सरकारने १० हप्ते जमा केले आहेत. आता शेतकऱ्यांनी ११ वा टप्पा मिळण्याची प्रतीक्षा आहे. परंतु, यावेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधवकारक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *