महाराष्ट्रावर दुहेरी संकट, पुढील 5 दिवस अत्यंत महत्त्वाचे

दोन वर्षांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचं संकट होतं. आता लसीकरण ही मोठ्या वेगाने सुरू आहे आणि कोरोना बाधितांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. कोरोनाच्या या संकटातून मुक्तता होत असतानाच आता महाराष्ट्रावर दोन नवी संकटे घोंगावत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. तापमानातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच आता येत्या पाच दिवसांत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 5 दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यानुसार, 29 मार्च 2022 रोजी बुलढाणा, अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्यांना यल्लो अलर्ट (alert) दिला आहे.

30 मार्च रोजी 11 जिल्ह्यांना यल्लो अलर्ट

हवामान खात्याकडून 30 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.

31 मार्च रोजी या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट

31 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान खात्याने यल्लो अलर्ट (alert) दिला आहे.

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा

30 मार्च

मध्य महाराष्ट्र – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

मराठवाडा – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

विदर्भ – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

31 मार्च

मध्य महाराष्ट्र – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

मराठवाडा – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

विदर्भ – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

1 एप्रिल

मध्य महाराष्ट्र – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

मराठवाडा – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

विदर्भ – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र अंधारात जाण्याची शक्यता

उष्णतेची लाट येण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला असतानाच दुसरं संकट महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे आणि ते म्हणजे वीज पुरवठा खंडित होण्याचं. राज्यातील वीज कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेले आहेत. आज वीज कर्मचारी संघटना आणि ऊर्जामंत्री यांच्यात एक बैठक होणार होती. मात्र, वीज कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरूच ठेवल्याने ऊर्जामंत्र्यांनी आपली नियोजित बैठक रद्द केली. तसेच वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा दिला.

वीज कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यासोबतच संपामुळे राज्यातील कोळसा पुरवणारी साखळी खंडीत झाली. त्यामुळे राज्यावर विजेचे संकट आले आहे. राज्य वीज कर्मचाऱ्यांचा संप सुटला तरी लोडशेडिंगचे संकट मिटणार नाही. कारण कोल इंडियाच्या युनियन देखील संपावर गेले आहे. त्यामुळे पुढची दोन दिवस राज्याला कोणताही कोळशाचा पुरवठा होणार नाही. परिणामी महानिर्मिती आणि एनटीपीसी दोघांचेही औष्णिक विद्युत केंद्र कोळसा अभावी प्रभावित होणार आहे.

महानिर्मिती रोज कोल इंडिया कडून 1 लाख 30 हजार मॅट्रिक टन कोळसा विकत घेते. दोन दिवस यातला एक टन कोळसा महानिर्मितीला मिळणार नाही. त्यामुळे राज्यातील पारस, नाशिक, परळी व भुसावळ या केंद्रावरील 1900 MV वीजनिर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती एनटीपीसीच्या केंद्राची आहे राज्य सरकारला रोज पाच हजार मेगावॅट वीज मिळते मात्र कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे त्यांची वीज निर्मिती देखील प्रभावित होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *