रेल्वे रुळावर आढळला महिलेचा मृतदेह

तालुक्यातील काळखोडे शिवारातून गेलेल्या रेल्वे रुळावर एका ४० ते ४५ वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आहे. या घटनेची माहिती गँगमन मच्छिंद्र देवढे यांनी चांदवड पोलिसांत दिली.

मृत महिलेच्या अंगावर पिवळ्या रंगाची साडी व निळसर रंगाचे ब्लाऊज असून, उजव्या हातावर ‘सौ. बानूबाई जगन गांगुर्डे’ असे नाव गोंदलेले आहे. या वर्णनाच्या महिलेच्या परिचितांनी चांदवड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी केले आहे. मृत महिलेचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *