मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा स्वराज्यक्रांतीजनआंदोलन महाराष्ट्र यांची मागणी

दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली घडवून मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर एका विशिष्ठ धर्माविरुद्ध बेताल वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्था बिघडवून शांतता भंग करणारे राजठाकरेयांच्याविरोधात भा. द . वि कलम १५३ , १५३ अ , १५३ ब , २९५ अ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वराज्यक्रांती जनआंदोलन महाराष्ट्रच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मापोलीसनिरीक्षकजयसिंगपूरपोलीस_स्टेशन यांना निवेदन देण्यात आले .
सध्या हिजाब प्रकरण ,काश्मीर फाईल्स सारख्या प्रकरणामुळे देशातील व महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्ती करीत आहेत. अशा प्रसंगी देशात खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्याचे काम राजकीय नेत्यांचे असताना मुस्लिम बांधवांच्या रमजान सारख्या पवित्र महिना सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांनी मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानामध्ये दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली घडवून मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर एका विशिष्ठ धर्माविरुद्ध बेताल वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्था बिघडवून शांतता भंग केली आहे. शनिवार दि. २/०४/२०२२ रोजी राज ठाकरे यांनी असे वक्तव्य केले कि , ” मदरशांवर धाडी टाका , त्यामध्ये काही काही सापडेल . तसेच मशिदींवरील लागलेले भोंगे उतरावेच लागतील ,सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल . नाहीतर आजच सांगतोय ,आत्ताच सांगतोय ज्या मशिदी च्या समोर भोंगे वाजतील त्यासमोर जाऊन दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा ” श्री . राज ठाकरे यांनी केलेल्या राष्ट्रीय एकात्मतेस बाधक व समाजात द्वेष पसरवणाऱ्या या वक्तव्यांमुळे दुसऱ्याच दिवशी दि. ३/०४/२०२२ रोजी कल्याण मधील साई चौकात मनसे कार्यकर्त्यांनी अजान विरोधात हनुमान चालीसा लावून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला ..तसेच फेसबुक ( सोशल मिडीया ) मधून आक्षेपार्थ मजकूर लिहून राज ठाकरे यांचा अपमान केलेबद्दलचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जयसिंगपूर शहराच्या वतीने देण्यात आले आहे . मागील दशकापूर्वी मिरज शहरातील दंगलीमुळे सांगली- कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भागात याचा त्रास झाला .मोठी मनुष्यहानी व वित्तहानी झाली . जयसिंगपूर शहरातील नागरिक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराचा वारसा जपत येथील राजकीय पक्ष सामाजिक सलोखा राखत अशा घटनाना वेशीबाहेर ठेवतात.भगवंत जांभळे, बंटी शहा हे राजकीय पदाधिकाऱ्यांसह शहरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत .शहराच्या शांततेत मोठा वाटा आहे. अशावेळेस जयसिंगपूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2022 असल्यामुळे मोठी दंगल घङू शकण्याची शंका व्यक्त होत आहे .त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री . राज ठाकरे यांनी शनिवार दि. २/०४/२०२२ रोजी जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सरपणे राष्ट्रीय एकात्मतेला बाधक व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेछूट ,बेताल विशिष्ठ धर्मियांच्या भावना दुखवण्याचा उद्देशाने व दोन समाजात तेढ निर्माण करून दंगली घडवून दहशत माजवण्याच्या हेतूने हेतूतपुरस्सर आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे .यामुळे श्री . राज ठाकरे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम १५३, १५३ अ , १५३ ब ,२९५ अ ,२९८ ,५००, ५०१ ,५०२ ,५०४ ,१२० ब ,३४ प्रमाणे गुन्हा तात्काळ दाखल करावा .अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.सदर मागणीचे निवेदन जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र मस्के याना देण्यात आले. तसेच निवेदनची प्रत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री-दिलीप वळसे-पाटील यांना मेलद्वारे पाठविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *