उदगाव येथील महिलेने पैशासाठी विकली किडनी, किडीनी काढून घेऊन संबंधितांनी पैसेच दिले नाही
उदगाव येथील सारीका सुतार या महिलेने पैशाच्या अडचणीतून चक्क किडनी विकली आहे. पण ठरलेला व्यवहार पुर्ण झाला नसलामुळे आणि पैसे मिळाले नसल्यामुळे तीने पुणे पोलिसांत याप्रकरणाची तक्रार दाखल केली आहे.
पैशाच्या अडचणीतून सुरू झालेला त्या महिलेचा संघर्ष आत्ता कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. आत्ता यापुढे तिला तिच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यासाठी न्याय मिळावा म्हणून पुन्हा जखमी अवस्थेत संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे किडनी विक्री पासून ते फसवणूकीपर्यंच्या या प्रकरणाची शिरोळ तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. शिरोळ तालुक्यात गेल्या दोन अडीच वर्षापासून सामान्य नागरीक विविध नैसर्गीक संकटांमुळे अडचणीत सापडला आहे. पहिल्यांदा महापूर, मग कोरोना आणि सरकारने जबदरदस्तीने लावलेला लाँकडाऊन आणि पुन्हा महापूर या संकटांमुळे ह्या तालुक्यातील गोरगरीबांना जगने कठीण झाले आहे. मात्र याचे कोणत्याही लोकप्रतिनिधीना भान नाही. कोट्यावधिंच्या विकासाचे फूगवून आकडे सांगणाऱ्यांची ज्या महिलेने पैशासाठी किडनी विकली त्या महिलेला हे पाऊल का उचलावे लागले याचे उत्तर देणे ही त्यांची जबाबदारी आहे. किंबहुना नैतिकताही आहेच ते हे धाडस करतील का आणि याबद्दल त्या लोकप्रतिनिधींना प्रश्न कोणतरी जबाबदार व्यक्ती विच्यारेल का ? हाच खरा सवाल आहे.