राजकीय नेत्यांनी शब्द जपून वापरावेत; रोहित पवार

सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे जपून आणि मोजून वापरले पाहिजेत, असा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (mla rohit pawar) यांनी शिवसेचेने ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (shivsena mp sanjay raut) यांना दिला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमैयांवर टिका केली आहे. (sanjay raut on kirit somaiya) राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. यानंतर आता आमदार रोहित पवार यांनीही संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली
कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो. भाजप सूड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली आहे. परंतु बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून आणि मोपून बोललं पाहिजे, असा सल्ला ही आमदार पवार यांनी दिला आहे.’ संत-छाया’ वारकरी भक्तनिवासाच्या भूमीपुजन कार्यक्रमासाठी रोहित पवार पंढरपूरमध्ये आले होते. ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्यानंतर ते आक्रमक झाले आहे. त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ईडीने आपल्यावर कारवाई केली असली तरी, आपण कोणाच्याही बापाला घाबरत नाही. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी वेळोवेळी आपल्यावर दबाव टाकला जात होता. या दबावातून ही कारवाई केली गेली असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. तसेच त्यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैयांवर खालच्या शब्दात टीका केली. ते म्हणाले, तो येडXX आहे, चुXX आहे. तसेच महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. अशा लोकांना महाराष्ट्रात स्थान नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *