शिवसैनिकांकडून किरीट सोमय्या यांचा निषेध
माजी खासदार भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून देशद्रोह झाला असून, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कराड शहरात शिवसैनिकांनी निदर्शने केली.
शिवतीर्थ (दत्त चौक कराड ) येथे निदर्शने करत किरीट सोमय्या यांच्यासोबत केंद्र सरकारविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. वाढती महागाई आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर याविरोधात संतप्त भावना व्यक्त करत शिवसैनिकांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला.
भाजप नेते किरीट साेमय्या आणि त्यांचे पुत्र नील साेमय्या यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी गोळ्या केलेल्या निधीत झालेल्याअपहार प्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी गोळ्या केलेल्या निधीत सोमय्या पिता-पुत्रांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्या आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी नागरिकांकडून गोळा केलेल्या निधीत ५८ काेटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला होता.