समृद्धी महामार्ग १ मेपासून वाहतुकीसाठी हाेणार खुला

राज्यातील सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा समजला जाणारा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्ग होता. या समृद्धी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे द्रुतगती महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. समृद्धी महामार्ग हा उपराजधानी ते राजधानी असा जोडला जाणारा महामार्ग आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांचा शेतमाल असो किंवा कारखानदारांसाठी कमी वेळात राजधानी पोहोचला जावा या संकल्पनेतून हा महामार्ग तयार करण्यात आलेला आहे. यावरून नागपूर ते मुंबई केवळ सात तासात अंतर पार करता येणार आहे. म्हणूनच या महामार्गाला समृद्धी महामार्ग असं म्हटले जाते.
सध्या या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा १ मे पासून वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. सेलू ते वाशिम तिथपर्यंत हा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. नुकतीच याबाबत माहिती देण्यात आली आहे की, समृद्धी महामार्ग हा राज्यातला सर्वात मोठा आणि वेगवान महामार्ग आहे. समृद्धी महामार्गाचे कामकाज पूर्ण झाले असल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी आता खुला केला जाणार आहे.
नागपूरपासून वर्धा, अमरावती, अकोला आणि वाशिम या चार जिल्ह्यातील वाहतूक समृद्धी महामार्गाची सुरू केली जाणार आहे. याबाबत या रस्त्याची चाचणी सुद्धा घेण्यात आलेली आहे. त्यामुळेच वाहतुकीसाठी रस्ता आता उघडला जाणार आहे. पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी असा सुरू करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. शुभारंभाची तारीख अधिकृतरित्या जाहिर झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *