पुढचा नंबर हसन मुश्रीफ आणि…

political news

political news – यशवंत जाधव यांच्यानंतर आता पुढचा नंबर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांचा असेल, असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून मी दिल्लीत यशवंत जाधव यांच्या घोटाळ्यांचा पाठपुरावा करत होतो. आता त्यांचे काय झाले, हे तुम्ही पाहतच आहात.

आता मी पुन्हा दिल्लीत आलो आहे. यावेळी मी हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आलो आहे. ईडीकडून कारवाई होणाऱ्या नेत्यांमध्ये आता पुढचा क्रमांक हसन मुश्रीफ यांचा असेल, असे किरीट सोमय्या यांनी जाहीर केले. ते शुक्रवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हसन मुश्रीफ यांनी जनतेला लुटून मोठी माया जमवली आहे. हे पैसे कुठे लपवलेत? त्यांच्या १५८ कोटीच्या घोटाळ्याचे पुरावे तर मी दिलेच आहेत. यावर आता त्यांना उत्तर द्यावे लागले. त्यामुळे आगामी काळात हसन मुश्रीफ यांनी सांभाळून राहावे. काही आठवड्यानंतर ‘साले’ तर आहेतच, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. (political news)

किरीट सोमय्या यांच्या या वक्तव्याचा रोख रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या दिशेने होता. काही दिवसांपूर्वीच ‘ईडी’ने श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित ठाण्यातील ११ कोटीच्या मालमत्तेवर टाच आणली होती. त्यामुळे आता ईडी श्रीधर पाटणकर यांना चौकशीसाठी बोलावणार किंवा त्यांच्यावर अटकेसारखी कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शिवसेना नेते व महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्याशी संबंधित मालमत्तांवर टाच आणली आहे. यशवंत जाधव यांच्याशी संबंधित ४१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात भायखळ्यातील ३१ फ्लॅट्स आणि वांद्रे येथील ५ कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *