राजकीय व्यासपीठावर एक नवीन जॉनी लिव्हर आलाय
राज ठाकरे यांना जशाच तसे उत्तर दिले जाणार असून उत्तर पूजेनंतर विसर्जन होते, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. जितेंद्र आव्हाड यांनी सभेच्या जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जाऊन अभिवादन का केले नाही, छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एकमेव वार करणाऱ्याचे मुंडके छाटण्यात आले, त्या कृष्णाजी भास्कर यांचे आडनाव कुलकर्णी हे होते, ते का सांगितले जात नाही, हा इतिहास राज यांना माहित नाही का? असे प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केले आहेत.
नाशिक : कादवा चेअरमनपदी श्रीराम शेटे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात उत्तर सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविण्याचे अल्टिमेटम दिले. त्याचसभेत आव्हाड यांच्यावर टीका करीत नागाची उपमा दिली. त्यावर प्रत्युत्तर देताना आव्हाड यांनी मिमिक्री करणाऱ्या राज यांची तुलना जॉनी लिव्हर याच्याशी केली. यापुढे ठाकरे यांना तुकाराम महाराज यांच्या वचनानुसार जसाच तसे उत्तर देणार आहोत.राज ठाकरे यांनी इतिहास वाचावा, त्यांना फक्त पुरंदरे यांचा इतिहास माहित आहे, असा टोला लगावला. कालच्या सभेतील भोंग्याबाबत माफी मागा असे सांगत सभेच्या १०० मीटर अंतरावर काय नसावे याचा विसर पडला का? माथी भडकवून दंगली घडविण्याचे काम केले जात आहे, दंगलीत कुणा नेत्याचे घर जळत नाही, तरुणांना जेलमधून सोडविण्यासाठी नेते नाही तर आई बाबाला यावे लागते याचा विचार तरुणांनी करावा, असे आवाहनदेखील आव्हाड यांनी केले.
”देशाच्या चित्रपट सृष्टीला जे जॉनी लिव्हर देऊ शकला ते कोणीच नंतर देऊ शकलं नाही. आज महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर एक नवीन जॉनी लिव्हर जन्माला आला आहे. या नवीन जॉनी लिव्हरला खूप खूप शुभेच्छा! जशास तसे ही संत तुकारामाची शिकवण …” असे आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे.