मुंबई इंडियन्स कर्णधार रोहितला २४ लाखांचा दंड
भारताच्या कसोटी, एकदिवसीय व टी-२० संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्मा याच्यावरील दबाव वाढत चालला असल्याचे आयपीएलमध्ये दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी पाच सामन्यांमधून दुसऱ्यांदा षटकांची गती राखली नाही. पुण्यात बुधवारी रंगलेल्या पंजाब किंग्जविरुद्धच्या लढतीत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना निर्धारित वेळेत षटके पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे कर्णधार रोहितला २४ लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच संघातील इतर खेळाडूंकडून ६ लाख किंवा मानधनातील २५ टक्के यांच्यापैकी जी रक्कम कमी असेल, ती कापली जाणार आहेमुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएल मोसमात सलग पाच लढतींमध्ये हार सहन करावी लागली आहे. या मोसमात मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला नाही, तर पुढच्या मोसमात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व इतर खेळाडूकडे सोपवण्यात आल्यास आश्चर्य वाटायला नको. आता मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांकडून असे तिसऱ्यांदा घडल्यास कर्णधार रोहितला एका सामन्याला मुकावे लागणार आहे.