एका शब्दात शरद पवारांनी उडवली फडणवीसांच्या ट्वीटची खिल्ली

‘देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी ट्वीट करून आरोप केले त्याचा फक्त मी एंजॉय करतोय, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar press conference at jalgaon) यांनी एक शब्दांत भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर दिले.

जळगावात राष्ट्रवादीच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलत असताना शरद पवार यांनवी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट मी पाहिले, त्यांचा मी आनंद घेतो. मला काही समजत नाही, त्यांनी जातीवादाचा आरोप केला, त्याबद्दल काही समजत नाही. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्यावेळी पहिल्या राज्याचे नेतृत्व हे छगन भुजबळ हे होते. त्यांच्या नंतरच्या काळामध्ये मधुकर पिचड होते. त्यानंतर प्रवीण गुजराती होते, तटकरे होते. समाजातील प्रत्येक घटकांना घेऊन जाणारी माणसं होती. पक्षाची नीती एका जातीला धरून नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेला मी महत्त्व देत नाही, असं पवार म्हणाले.

‘फडणवीस यांनी माझ्यावर एक आरोप केला, मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्यामध्ये ११ झाले असताना 12 झाले असल्याचे सांगितले. त्यात एक मुस्लिम भागाचे नाव घेतले. हे शंभर टक्के बरोबर आहे. त्याचे कारण ११ ठिकाणी बॉम्बस्फोट झाली ते हिंदूची महत्त्वाची ठिकाणं होती, सिद्धविनायक मंदीर होते. हा बॉम्बस्फोट कुणी केला याची माहिती घेतली. त्यासाठी साहित्य काय वापरले हे मी स्वत जाऊन पाहिले होते. तो बॉम्बस्फोट झाला. १५ दिवस देशाचा संरक्षण मंत्री होतो. पहिली बॉम्बस्फोट झाला त्यात साहित्य वापरले ते कराचीमधील होते. असा बॉम्बस्फोट करून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करायचा आणि आग भडकावी अशी भूमिका होता. मी 12 वे ठिकाण हे मोहम्मद अली रोड असल्याचे सांगितले, त्यामुळे जातीय दंगली करण्याचे ज्यांचे इरादे होते ते मागे सरले. सर्व हिंदू आणि मुस्लिम लोक एकत्र आले. त्यामुळे दंगल घडली नाही, असा खुलासा पवारांनी केला.’त्यावेळी श्रीकृष्ण आयोगाची समिती स्थापन केली होती. त्यांनी मला बोलावले होते. त्यांनी विचारले असं का बोलले तर मी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्या समितीने अहवालात स्पष्टपणे लिहिलं की, पवारांनी मुख्यमंत्री असताना अशी भूमिका घेतली असती तर मुंबईत आग लागली असती. त्यांचा हा निर्णय समाजाच्या हिताचा होता. आता ज्यांना तारतम्य कळत नाही, गांभीर्य समजत नाही त्यांनी अशी विधान केली, तर त्याबद्दल फार बोलण्याची गरज नाही’ असं म्हणत पवारांनी फडणवीसांना टोला लगावला.

(मनसेला राष्ट्रवादीचं ‘पुरोगामी’ उत्तर? हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन)

तसंच, ‘मनसेबद्दल मला काही सांगता येत नाही, आतापर्यंत त्यांनी काही केले, याचे काही झाले नाही. पण एक काळजी वाटते सामाजिक ऐक्य धोक्यात येऊ नये, अशी चिंता पवारांनी व्यक्त केली.

‘ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, अशा दोन राज्यात सत्ता मिळवण्यासाठी काही करून पर्यंत करत आहे. यासाठी ईडीचा वापर करत आहे. त्यामुळे ईडीचे छापेमारी सुरू आहे. कायद्यानुसार आणि नियमानुसार कारवाई करण्याबाबत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री निर्णय घेतली, असंही पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *