राज ठाकरेंची पुण्यात महाआरती

मनसेकडून आज, शनिवारी हनुमान जयंतीला पुण्यात अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती होत असताना शिवसेनेच्यावतीनेही दादरच्या गोल मंदिरात हनुमानाची आरती केली जाणार आहे. या चढाओढीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही यात उडी घेतली असून पक्षाकडून पुण्यात आरती केली जाणार आहे. त्यामुळे हनुमान जयंतीच्या निमित्ताने एकूणच राज्यातील राजकारण तापल्याचे पाहायला मिळणार आहे. (Political events for hanuman jayanti 2022)

‘राज्यात तीन मेपर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, अन्यथा देशभरात हनुमान चालिसा लावणार’, या भूमिकेवर राज ठाम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अवघ्या चार दिवसांत राज यांच्या हस्ते पुण्यात महाआरती होणार आहे. पुण्यातील खालकर मारूती चौकात संध्याकाळी साडेसहा वाजता राज यांच्या उपस्थितीत आरती आणि हनुमानचालिसा पठण करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी पुण्यातील कोथरूड भागातील दुधाने लॉन्स या ठिकाणी दिवसभर पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या आढावा बैठका होणार आहेत. यानंतर दुधाने लॉन्सच्या समोर असलेल्या हनुमान मंदिरात आरती आणि तिथेच रोजा इफ्तारचे एकत्रित आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्यावतीनही शनिवारी दादरच्या गोल मंदिरात हनुमानाची महाआरती करण्यात येणार आहे. आमदार सदा सरवणकर हनुमानाची आरती करणार आहेत.

राज ठाकरे यांचे आज हनुमान चालिसा पठण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) हनुमान जयंतीनिमित्त आज, शनिवारी (१६ एप्रिल) पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती आणि सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. कुमठेकर रस्त्यावर खालकर तालीम चौकातील हनुमान मंदिरात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली. ठाण्यातील उत्तर सभेत मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी राज्य सरकारला तीन मेचा इशारा दिल्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *