राज ठाकरे यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल मोठी घोषणा केली. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अयोध्या (Ayodhya) दौऱ्याची तारीख घोषित केली. पाच जूनला पक्षातील सर्व सहकाऱ्यांसोत अयोध्येला जाणार आहे, तिथे जाऊन दर्शन घेईन, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

त्यानंतर आता राज ठाकरे यांना उत्तर प्रदेश दौऱ्या दरम्यान विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार राज ठाकरे यांना अधिकची सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांन केंद्र सरकारचीही सुरक्षा देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची भूमिका घेतली आहे. मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा काढला आहे. यावरुन काही धार्मिक तेढ किंवा इतर काही अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावर सुरक्षा दिली जाणार आहे. त्याचवेळी राज ठाकरे यांना धमक्या येत असतील तर तर केंद्र सरकारच्यावतीनेही विशेष सुरक्षा दिली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज ठाकरे यांची आक्रमक भूमीका
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन त्यांनी देशभरातील नागरिकांना केलं आहे. राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत, अशी मागणी केली होती. त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये देखील राज्य सरकारला हे भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा तापला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *