जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई
जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई 3 आरोपी जेरबंद करून 2,30,000 रू किमतीच्या 6 मोटारसायकली जप्त करण्यात यश
माननीय पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे साहेब,माननीय अप्पर पोलीस अधीक्षक गड विभाग जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी माननीय श्री रामेश्वर वैंजणे, यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी आज आदेशित केल्याने जयसिंगपूर शहरात पेट्रोल करत असताना 26/04/2022 रोजी रात्री 1.00 च्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल 1133 रोहित डावाळे यांनी गल्ली क्रमांक 12 ज्योतिर्लिंग मेडिकल जवळ तीन संशयितरित्या फिरत असताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांना नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे
1) वैभव रामचंद्र बोडके वय 32,रा. आपटेनगर कोल्हापूर
2) संदीप बाळासाहेब पोतदार वय 30, रा. शिरदवाड तालुका शिरोळ.
3) रोहित विलास पोतदार, रा.आपटेनगर कोल्हापूर
या संशयिताकडून अधिक चौकशी केली असता त्यांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे गु.र. नं.132/2022 ,133/2022 ,137/2022 भा.द.वि.स कलम 379 प्रमाणे मोटरसायकलचे चोरीचे गुन्हे दाखल होते.
वरील दाखल असलेल्या गुन्ह्यातील मोटरसायकली या संशयितांनी चोरी केल्याचे सांगितले तसेच इतर दोन मोटरसायकल व गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल अशा एकूण 2,30,000/- रू किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक गड विभाग जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी माननीय श्री रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के,पोसई वाघ, सहा.फौजदार चुळचुक, पो.हे.कॉ 1253 बन्ने, म.पो.हे.कॉ 780 मुल्ला, 290 कांबळे, पो.कॉ 885, पो.कॉ संदेश शेटे, पो.कॉ 1333 रोहित डावाळे, 1337 पाटील, पो.कॉ सुर्यवंशी, होमगार्ड राकेश माने,हुसेन जतकर,मिलिंद शिंगाडे यांनी केली आहे.
पोलीस मित्र संग्राम राजपूत,समीर मुल्ला,दीपक नाईक,अक्षय भजनावळे,साजिद मुल्ला,मारुती जांगडे,दादू वाघमोडे त्यांचे तपास कामात मोलाचे सहकार्य लाभले. तसेच आरोपी क्रमांक 1 हा हॉटेल व्यवसायिक असून त्याच्या कडे चोरी करण्याचे कारण विचारले असता त्यांने कर्जापोटी चोरी केल्याचे कबूल केले आहे.
प्रतिनिधी:- विजय पाटील