धोनीची पत्नी संतापली; ट्विट करून विचारले तिखट प्रश्न
(sports news) झारखंडमध्ये एकीकडे उष्णतेमुळे लोकांची अवस्था बिकट होत आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वीज संकटामुळे जनता हैराण झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनीने वीज संकटावर झारखंड राज्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत साक्षीने ट्विट करत लिहिले आहे की, झारखंडमध्ये इतक्या वर्षांपासून वीज संकट का आहे.
झारखंडमध्ये वीज संकटामुळे लोक हैरान झाले आहे. त्यामुळे यावर साक्षी धोनीने प्रश्न उपस्थित केला आहे. साक्षीने ट्विट करून लिहिले आहे की, फक्त हे जाणून घ्यायचे आहे की झारखंडमध्ये इतकी वर्षे वीज संकट का आहे? आम्ही जाणीवपूर्वक खात्री करत आहोत की आम्ही उर्जेची बचत करतो.
साक्षी धोनीचे शेवटचे ट्विट एक वर्षापूर्वी केले होते. सततच्या लोडशेडिंगमुळे झारखंड राज्यातील जनता हैराण झाली असून. राज्यातील बहुतांश भागात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पश्चिमी सिंहभूम, कोडरमा आणि गिरिडीह जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेने वेढले आहे. 28 एप्रिलपर्यंत रांची, बोकारो, पूर्वी सिंहभूम, आणि चतरा येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. (sports news)
5 ते 7 तास वीजपुरवठा खंडित
झारखंडमधील शहरांमध्ये सरासरी 5 तासांपेक्षा जास्त आणि ग्रामीण भागात 7 तासांपेक्षा जास्त वीज खंडित होते असते. त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकांना उन्हाळ्यात विजेविना जगावे लागत आहे.