चेक पोस्टबाबत महाविकास आघाडीचे मोठं पाऊल

राज्यातील चेक पोस्ट (check post) बंद होण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने गृह विभागाने परिवहन विभागाला पत्र लिहून पुढील 3 महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

चेकपोस्टचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची नेमणूक करण्यात आली आहे. चेकपोस्ट बंद होताना काय परिणाम होतील, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास होणार आहे. चेकपोस्टवरील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला होता. चेकपोस्टवर भ्रष्टाचार वाढत असल्याचं स्टिंग ऑपरेशन केलं होते. त्यानंतर आता सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

5 सदस्यीय अभ्यास गटाची निर्मिती करण्यात आली आहे. परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या अभ्यास गटाची निर्मिती करण्यात येणार आहे. परिवहन विभागात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे.

चेकपोस्ट (check post) बंद होताना काय परिणाम होतील, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा देखील अभ्यास होणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान सीमा तपासणी नाके बंद करण्याची कार्यपद्धती काय असावी? चेकपोस्ट बंद केल्याने राज्य सरकारवर काय आर्थिक बोजा पडेल, याचाही अभ्यास केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *