राज्यातल्या वीज संकटावर प्रश्न विचारताच ऊर्जामंत्र्यांनी काढला पळ, म्हणाले…

महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून विजेचं संकट (Electricity crisis) घोंघावत आहे. अशातच ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांना राज्यातल्या वीज संकटावर प्रश्न विचारला असता पळ काढल्याचं समोर आलं आहे. राज्यात कुठेही लोडशेडिंग नसल्याचा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.

राज्यात कोळशाचा तुटवडा नसल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले आहेत. नितीन राऊत यांच्या उत्तरानंतर मग राज्याल्या लोडशेडिंग जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. जर नितीन राऊत म्हणतात राज्यात लोडशेडिंग नाही, कोळशाचा तुटवडा नाही, मग लोकांच्या घरांमध्ये अंधार का? असाही सवाल उपस्थित होत आहे.

आज दुपारी एक वाजता राज्यात विजेची एकूण मागणी होती. 26 हजार 250 मेगावॅट आणि राज्याकडे फक्त 16 हजार 644 मेगावॅट वीज आहे. 9606 मेगावॅट वीज केंद्र सरकारकडून मिळत आहे. त्यामुळे राज्यात या घडीला 1489 ते 2000 मेगावॅटचा तुटवडा आहे.
राज्यात विजेची एकूण मागणी होती 26 हजार 250 मेगावॅट

राज्य सरकारकडे महाजनको आणि खासगी विद्युत निर्मिती केंद्र पकडून वीज आहे 16 हजार 444 मेगावॅट

यात महाजनको वीजनिर्मिती करत आहे 7 हजार 726 मेगावॅट व खाजगी वीज निर्मिती केंद्र राज्याला देताय 7 हजार 439 मेगावॅट

केंद्र सरकारकडून राज्याला मिळत आहे 9 हजार 606 मेगावॅट वीज

आज राज्यात विजेची तूट असणार आहे 1489 मेगावॅट ते 2000 मेगावॅट

महाजनकोची वीजनिर्मिती ठप्प ?

महाजनकोची एकूण वीज निर्मिती क्षमता आहे 9420 मेगावॅट

माझं को वीजनिर्मिती करत आहे फक्त 7726 मेगावॅट

कोयना हायड्रो प्रकल्पातून वीज निर्मिती होत आहे फक्त 152 मेगावॅट

उरण गॅस प्रकल्पातून वीज निर्मिती होत आहे 383 मेगावॅट

राज्यात कोणत्या औष्णिक विद्युत केंद्रात किती दिवस पुरेल इतका कोळसा साठा आहे.

औष्णिक विद्युत केंद्र दिवस

कोराडी- 2

नाशिक-1

भुसावळ- 2

परळी- 9

पारस-5

चंद्रपूर- 5

खापरखेडा- 5

हे प्रश्न अनुत्तरित

नितीन राऊत कोणत्या आधारावर म्हणतात की राज्यात लोडशेडिंग नाही?
नितीन राऊत नागरिकांना वीज संकटाबाबत राज्याच्या नागरिकांना अंधारात ठेवत आहेत का?
जर नितीन राऊत म्हणतात, राज्यात लोडशेडिंग नाही, कोळशाचा तुटवडा नाही, मग लोकांच्या घरांमध्ये अंधार का?
ग्रामीण भागात शेतकऱ्यांना का फक्त आठ तास वीज मिळते?
उकाड्यापासून हैराण नागरिकांच्या घरचे कुलर पंखे विजेअभावी का बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *