अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार; संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा

” मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाही. यामुळे राज्यसभा निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा “, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली. त्यांनी ‘ स्वराज्य ‘ या संघटनेची स्थापना करत असल्याची घोषणाही केली आहे.खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा राज्यसभेच्या सदस्यपदाचा कार्यकाल ३ मे रोजी संपला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज (दि.१२) आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देण्यासाठी आपण भेटल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपतीनियुक्त खासदार होण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचेही त्यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *