इचलकरंजी : सावकर मादनाईक यांचा जिल्हा नियोजन समितीचा राजीनामा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली होती. पाच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे यादी पाठवली होती. त्यावरती गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. दरम्यानच्या काळात स्वाभिमानी सरकारमधून बाहेर पडली. त्यामुळे नियोजन समितीचे पद स्वीकारण्यात अर्थ नाही, असे स्वाभिमानीच्या वतीने सांगण्यात आले.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना स्थान दिले होते. समितीत आमदार राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, जे. एफ. पाटील, एस. एस. देशमुख, संभाजी पवार, बाजीराव पाटील, सावकर मादनाईक यांची नावे जाहीर केली होती. मात्र, 12 तासांच्या आतच स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांनी राजीनामा दिला.